आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस बॉल क्रिकेट विजेता जिंकणार लाखाचे बक्षीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- युवा सेना प्रस्तुत ‘दिव्य मराठी’ खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला येत्या १६ मेपासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या नावनोंदणीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद लाभला. शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील करमाड, कन्नड, वाळूज, फुलंब्री येथील संघांनीदेखील प्रवेश निश्चित केला आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्ब्ल १ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्या संघाला रोख ५० हजार रुपये मिळतील. याशिवाय मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट््समन, बेस्ट फील्डर अशी अनेक आकर्षक बक्षिसे दिली जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांच्या सर्व खेळाडूंना आयोजकांकडून प्रमाणपत्रेही दिली जातील. इतर अनेक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

ही खुली स्पर्धा असल्याने ग्रामीण भागातील संघ सहभागी होऊ शकतात. गल्लीबोळातील, ग्रामीण भागातील, तमाम युवा खेळाडूंना संधी मिळण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा म्हणजे टेनिस बॉलवर क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. ही स्पर्धा बाद फेरीची असेल. प्रत्येक संघाला १४ खेळाडूंसह स्पर्धेत सहभागी होता येईल.

येथे करावी संघांची नोंदणी
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना नावनोंदणीसाठी १४ आणि १५ मे रोजी अखेरची संधी आहे. इच्छुक संघांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालय, मोतीवाला कॉम्प्लेक्स, जालना रोड, सेव्हन हिल्सजवळ सकाळी ११.३० ते ५ या वेळेत नावनोंदणी करावी. १५ मे रोजी सकाळी ११.३० ते १ वाजेपर्यंतच नावनोंदणी होईल. एका संघाला स्पर्धा शुल्क ११०० रुपये ठेवण्यात आले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना १४ खेळाडूंची नावे आणि छायाचित्र प्रवेश अर्जावर द्यावे लागेल. प्रवेश अर्ज नावनोंदणीच्या ठिकाणीच मिळतील.
बातम्या आणखी आहेत...