आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस्विनी मुळेच्या घरी दिवाळी..!!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद । आशियाई नेमबाजी स्पर्धेत सांघिक गटात रौप्यपदक पटकाविल्यानंतर औरंगाबादेत (एन-12) तेजस्विनी मुळेच्या घरी आनंदोत्सवाला उधाण आले. तिच्या घरी नातेवाइकांनी आई, वडील आणि भावाला पेढे खाऊ घालून आनंद साजरा केला. या वेळी आई स्वाती मुळे यांनी देवाकडे प्रार्थना करून तेजस्विनीच्या उज्ज्वल कारकीर्दीसाठी आशीर्वाद मागितला. ‘तेजस्विनीला सुरुवातीपासून नेमबाजीचा छंद होता. तेजस्विनीने आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकावे, हे आपले स्वप्न असल्याचे’ या वेळी ‘दिव्य मराठी’शी बोलताना आई स्वाती मुळे यांनी सांगितले.