Home | Sports | Other Sports | tejaswini-sawant-gold-medal

वर्ल्‍ड चॅम्पियनशिपः तेजस्विनीचा ‘सुवर्ण’वेध

वृत्तसंस्‍था | Update - Aug 12, 2011, 04:55 AM IST

तेजस्विनी सावंतने महिला गटाच्या २५ मीटर पिस्तूल व ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकाचा वेध घेतला.

  • tejaswini-sawant-gold-medal

    पुणे- वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्‍ये कोल्हापूरच्या अव्वल नेमबाजपटू तेजस्विनी सावंतने महिला गटाच्या २५ मीटर पिस्तूल व ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकाचा वेध घेतला. पुण्यात खेळवल्या गेलेल्या ११ व्या कुमार सुरेंद्रसिंग मेमोरियल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सोनिया रॉयनेही किताबाचा बहुमान पटकावला. गतवर्षी सानियाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल व ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या गटात तेजस्विनी सावंतने ६७२.३ गुणांची कमाई करून स्पर्धेत अव्वल स्थानावर बाजी मारली. त्यापाठोपाठ ६७०.३ गुणांनी बाजी मारणाºया सीआयएसएफच्या कुहेली गांगुलीने दुसरे स्थान पटकावले. तसेच आर्मीच्या रुबी गांगुलीनेही ६६७.३ गुणांची खेळी करत तिसºया स्थानावर धडक मारली. लंडन आॅलिम्पिकचे तिकीट मिळवणाºया नेमबाज राही सरनोबतनेही चमकदार कामगिरी केली आहे.

Trending