आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tejewini And Ashverya Won Gold Medel In State Level Boxing

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत तेजस्विनी , ऐश्वर्याने पटकावले सुवर्णपदक.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वर्धा येथे झालेल्या वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पध्रेत जिल्ह्यातील आघाडीची खेळाडू तेजस्विनी जिवरग, ऐश्वर्या जगतापने सुवर्णपदक पटकावले.स्पध्रेत जिल्ह्यातील आघाडीची खेळाडू तेजस्विनी जिवरग, ऐश्वर्या जगतापने सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे त्यांची पंजाब येथे 4 ते 9 जानेवारीदरम्यान होणार्‍या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पध्रेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

त्याचप्रमाणे आसावरी पाटीलने रौप्य व अश्विनी नेमाडे, शालू हिवराळे आणि पूनम पाटोळेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 17 वर्षांखालील गटातील गतवर्षीची चॅम्पियन ऐश्वर्याने यंदाही आपला दबदबा कायम राखला. तिने 71 किलो वजन गटाच्या फायनलमध्ये मुंबईच्या अस्मिता पाटीलला रोमांचक लढतीत 10-9 अशा गुण फरकाने पराभूत करत सुवर्ण मिळवले. दुसरीकडे 53 किलो वजन गटात तेजस्विनीने अंतिम फेरीत पुण्याच्या धनर्शी दिंडेला नॉकआऊट करत पहिला क्रमांक मिळवला. या सर्व खेळाडू मॉरल किड्स स्कूलच्या आहेत. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक अनिल मिरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजेत्यांचे संस्थाध्यक्ष एस. आर. जैस्वाल, संदीप जैस्वाल, मुख्याध्यापिका अर्चना देशपांडे यांनी अभिनंदन केले.