Home »Sports »Latest News» Telugu Warriors V Mumbai Heroes In Ccl

CCL: सलमानच्‍या मुंबई 'हिरोज'ला भारी पडले तेलगू वॉरियर्स

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 19, 2013, 14:39 PM IST

सेलिब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल)मध्‍ये रविवारी हैदराबाद येथे मोठी कमाल झाली. मैदानात चौकार-षटकारांच्‍या आतषबाजी बरोबर सलमानच्‍या उपस्थितीचा प्रेक्षकांना डबल बोनस मिळाला.

मुंबई हिरोजला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी सलमान मैदानात उपस्थित होता. मात्र, त्‍याच्‍या संघाला तेलगु वॉरियर्सकडून पराभव स्‍वीकारावा लागला.

लालबहादूर शास्‍त्री स्‍टेडिअमवर झालेल्‍या सामन्‍यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई हिरोजला आपला प्रभाव पाडता आला नाही. त्‍यांना 20 षटकांमध्‍ये अवघ्‍या 134 धावाच करता आल्‍या. सुनील शेट्टीऐवजी कर्णधारपद भुषवणा-या आफताब शिवदासानीला तर खातेही उघडता आले नाही.

तेलगु वॉरियर्सला पाठिंबा देण्‍यासाठी आलेल्‍या दाक्षिणात्‍य सुंदरींच्‍या उपस्थितीमुळे स्‍फुरण चढलेल्‍या वॉरियर्सने 17.5 षटकातच निर्धारित लक्ष्‍य पूर्ण केले.

मुंबई हिरोजचा मालक सोहेल खान, ब्रँड अ‍ॅम्‍बेसेडर चित्रांगदा सिंग यांच्‍याबरोबर उपस्थित असलेल्‍या इतर स्‍टार्ससमोर मुंबईला दुसरा पराभव स्‍वीकारावा लागला.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या CCLची रंगीत मजा...

Next Article

Recommended