आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार ट्रकमधील बॅगांत दहा कोटी रूपये, आयकरचे महासंचालक स्वतंत्रकुमार यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई सेंट्रल टर्मिनसजवळ मंगळवारी चार ट्रकमधून जप्त करण्यात आलेल्या 104 बॅगांमध्ये अवघे दहा कोटी रुपये निघाले. आयकर खात्याचे महासंचालक स्वतंत्रकुमार यांनी बुधवारी ही माहिती दिली.


या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या 47 जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे, असे ते म्हणाले. दोनशे ते अडीचशे कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचा अंदाज आधी बांधला जात होता. जप्त केलेले सोने व हि-यांच्या दागिन्यांची मोजदाद करण्याचे काम 66 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असल्याचे स्वतंत्रकुमार यांनी सांगितले. गुजरातमधील अहमदाबाद अंगडिया कुरिअरमार्फत हा मुद्देमाल पाठवण्यात येत होता.