आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदिवसीय सामन्यासाठी तेंडूलकर, इरफान पठाण संघात, हरभजन बाहेरच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात होऊ घातलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. ऑस्ट्रेलियासह श्रीलंका या तिरंगी स्पर्धेत खेळणार आहे. या संघात फारसे बदल करण्यात आले नाहीत. संघात नऊ महिन्यानंतर सचिन तेंडूलकरला स्थान देण्यात आले आहे. अष्टपैलू इरफान पठाणलाही संधी देण्यात आली आहे. हरभजनसिंगला पुन्हा एकदा वगळले आहे. युवराजसिंग अनफिट असल्याने त्याचा विचार करण्यात आला नाही. मध्यमगती गोलंदाज प्रविणकुमार, लेगस्पिनर राहुल शर्मा यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
बीसीसीआयची चैन्नईत सुमारे एक तास वादळी चर्चा झाली. त्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ०-३ ने पिछाडीवर पडला आहे. त्यावरही चर्चा झाली. त्यानंतर बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी १७ जणांची टीम जाहीर केली.
वेगवान गोलंदाज म्हणून संघात झहीर खान, उमेश यादव, प्रविणकुमार, विनयकुमार, इरफान पठाण या पाच गोलंदाजाना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला ऑफस्पिनर आर. अश्विन, लेगस्पिनर राहुल शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा यालाही संधी देण्यात आली आहे. वरुन अरोन आणि मुनाफ पटेल यांचा जखमी असल्याने विचार केला गेला नाही. भारत या दौरयात दोन टी-२० सामने खेळणार आहे.
एकदिवसीय व टी-२० साठी पुढील संघ- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग (उपकर्णधार), सचिन तेंडूलकर, गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश शर्मा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, उमेश यादव, प्रवीणकुमार, विनयकुमार, मनोज तिवारी, राहुल शर्मा, प्रार्थिव पटेल, इरफान पठाण, झहीर खान.
'वाका'वर भारताचा डावाने लाजीरवाणा पराभव
धोनीवर एका सामन्‍याची बंदी, एडीलेडमध्‍ये सेहवाग करणार नेतृत्त्व
वरिष्‍ठांबद्दलचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्‍यायला हवाः धोनी