आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- मुंबई आणि सेनादल यांच्यात 16 जानेवारीपासून दिल्लीतील पालम मैदानावर रणजी चषकातील सेमीफायनलचा सामना होणार आहे. या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरकरला लिटिल मास्टर सुनील गावसकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
भारताकडून प्रथमश्रेणी सामन्यात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम गावसकर यांच्या नावे आहे. आणि हा विक्रम मोडण्याच्या अगदीनजीक तेंडुलकर आहे.
गावसकरने 348 प्रथमश्रेणी सामन्यातील 563 डावांमध्ये 25834 धावा केल्या आहेत. यामध्ये विक्रमी 81 शतकांचा समावेश आहे. तेंडुलकरने बडोदाविरूद्धच्या रणजी चषकाच्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात 80 वे शतक ठोकले होते. गावसकरची धावसंख्या गाठण्यास तेंडुलकरला 1016 धावा कमी पडतात. आतापर्यंत 300 प्रथमश्रेणी सामने खेळलेल्या तेंडुलकरने 476 डावांमध्ये 57.98 च्या सरासरीने 24818 धावा बनवल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेपूर्वी रणजी चषकात खेळून सराव करण्याची तेंडुलकरला संधी आहे. त्याशिवाय सेमीफायनलमध्ये शतक झळकवल्यास तो गावसकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉच्या 81 शतकांशी बरोबरी केली. तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेच्या बॅरी रिचर्ड्स, पाकिस्तानचा जावेद मियांदाद आणि इंग्लंडचा मॉरिस लीलेंड यांच्या 80 शतकांशी बरोबरी केली आहे. तेंडुलकरने आपल्या एकूण प्रथमश्रेणी सामन्यांच्या एकूण धावापैकी 15645 धावा या कसोटी सामन्यातील आहेत. त्याशिवाय त्याच्या नावावर 51 कसोटी शतकेही आहेत. याउलट गावसकरने कसोटी सामन्यात 10122 धावा आणि 34 शतके ठोकली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.