आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंघमच्‍या भेटीने भारावला मास्‍टर ब्‍लास्‍टर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर सध्‍या आपल्‍या मोकळया वेळाचा सदुपयोग जाहिरातीच्‍या चित्रिकरणात व्‍यतित करत आहे. एका जाहिरातीच्‍या चित्रिकरणासाठी मेहबूब स्‍टुडिओमध्‍ये पोहोचलेल्‍या सचिनची भेट बॉलिवूड अभिनेता अजय देवगणशी झाली.

अजयच्‍या भेटीने सचिन इतका खूश झाला की, त्‍याने अजयबरोबर आपला फोटो काढला आणि लगेच ट्विटरवर पोस्‍टदेखील केला. 'आज मी मेहबूब स्‍टेडियममध्‍ये अजय देवगणला भेटलो. तो एक जबरदस्‍त कलाकार आहे. अनेक वर्षांपासून तो चांगले काम करत आहे. असाच प्रगती कर अजय', असा ट्विट सचिनने केला आहे.
या सिनेमात सचिन तेंडुलकर बनणार अभिनेता
काँग्रेस पक्षात जाण्याचा कोणताही इरादा नाही- सचिन तेंडुलकर