आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis: Errani To Face Barthel In Paris Open Final

पॅरिस ओपन महिला टेनिस : सारा इराणी सेमीफायनलमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - अव्वल मानांकित सारा इराणीने शनिवारी पॅरिस ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तिने एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत बिगर मानांकित कार्ला सुआरेज नवारोवर 7-5, 4-6, 7-5 अशा फरकाने विजय मिळवला. यासाठी तिला तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली.

दुसरीकडे माजी विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्वितोव्हा, तिसरी मानांकित मारियन बार्टाेली व चेक गणराज्यची लुसी सफारोवाचे स्पर्धेतीलआव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

फ्रान्सच्या क्रिस्टिना लादेनोविचने चेक गणराज्यच्या क्वितोव्हावर 6-3, 6-4 ने सनसनाटी विजय मिळवला. दुसर्‍या लढतीत र्जमनीच्या मोना बार्थेलने फ्रान्सच्या बाटरेलीला 7-6, 6-4 ने हरवले. तसेच लुसी सफारोवाने हॉलंडची किकी बर्थेसविरुद्ध लढतीत 1-6, 5-7 अशा फरकाने पराभव पत्करला.