आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis Mahasangn, New Tension, Sania Mom Team Managaer Selection

टेनिस महासंघापुढे नवे संकट! सानियाच्या आईच्या निवडीमुळे आयओएची नोटिस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) च्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. लंडन ऑलिम्पिक संघ निवडीचा वाद शांत होण्यापूर्वीच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) ने टेनिस महासंघाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. सानिया मिर्झाची आई नसीमा यांना ऑलिम्पिक टीमच्या सपोर्ट स्टाफमध्ये महिला संघाची मॅनेजर म्हणून सामील करण्याच्या निर्णयाबद्दल आयओएने स्पष्टीकरण मागितले आहे.
टेनिस महासंघाने 5 सदस्यीय सपोर्ट स्टाफमध्ये नसीमा यांचा समावेश करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. आयओएने महासंघाला पाठवलेल्या नोटीसमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. सात खेळाडूंसाठी 5 खेळाडूंचे सपोर्ट स्टाफ का पाठवण्यात येत आहे ? असा प्रश्न नोटीसमध्ये विचारण्यात आला आहे. आयओएच्या नियमानुसार प्रत्येक टीमसोबत तीन अधिकार्‍यांचेच गट लंडनला जाऊ शकतात. टेनिस महासंघाला कारणे दाखवा नोटीस पाठवली असल्याची कबुली आयओएचे कार्याध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी दिली आहे.
संघ निवडीचा वाद काय होता?- लंडन ऑलिम्पिकच्या टेनिस संघ निवडीचा वाद सुरुवातीपासून आहे. सुरुवातीला महासंघाने पुरुष दुहेरीसाठी पेस-भूपतीची निवड केली. मात्र, भूपतीसह बोपन्नाने सुद्धा पेससोबत खेळण्यास नकार दिला. पेसला वाढता विरोध बघून महासंघाने भूपती-बोपन्ना आणि पेस-वर्धनची जोडी घोषित केली. सानियाला मिर्श दुहेरीत महेश भूपतीसोबत खेळायचे होते. मात्र, महासंघाने लिएंडर पेसला मिर्श दुहेरीत सानिया मिर्झासोबत निवडले.
सानियासाठी घेतला निर्णय- संघ निवडीच्या वादानंतर मिर्श दुहेरीत लिएंडर पेससोबत खेळण्यास सानिया मिर्झाने आक्षेप घेऊ नये म्हणून टेनिस महासंघाने तिच्या आईची मॅनेजर म्हणून निवड केली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. टेनिस महासंघाने नसीमा यांच्या अनुभवाचा उल्लेख करताना त्यांची निवड केली होती. नसीमा यांच्याकडे बर्‍याच ग्रँडस्लॅम स्पर्धा, आशियाड आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मॅनेजर म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. यामुळे त्यांची निवड करण्यात आली, असे भारतीय टेनिस महासंघाचे म्हणणे होते.
‘वादामुळे काही दिवस तणावात होतो’
न्यूयॉर्क- संघ निवडीचा वाद मागे सोडून आगामी लंडन ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याचे भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने म्हटले. ऑलिम्पिकचा पुरुष दुहेरीचा जोडीदार विष्णू वर्धनसोबत पेस काही दिवस सराव करणार आहे.
ऑलिम्पिकच्या तयारीबाबत पेस म्हणाला, ‘कोर्टबाहेर सुरू असलेल्या वादामुळे मी काही दिवस चांगलाच तणावात होतो. विम्बल्डनमध्ये सुरुवातीचे तीन-चार दिवस खूप टेंशनमध्ये गेले. मात्र, मी लयीत येताच सर्व अडचणी मागे सुटत गेल्या. अखेर कोर्टवरील कामगिरीला सर्वाधिक महत्व असते. खेळाडूची ओळख तेथूनच होते. आता मी लंडन ऑलिम्पिकवरच लक्ष केंद्रीत करीत आहे,’ असेही भारताच्या या खेळाडूने नमूद केले. लियांडर पेसने अटलांटा ऑलिम्पिकमध्ये एकेरीत कास्यपदक जिंकले होते. तो विक्रमी सहाव्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. विष्णू विम्बल्डनच्या वेळी माझ्या सोबत होता. अमेरिकेतही तो सोबत होता. मला माझे प्रशिक्षक रिक लीच यांच्याकडून विष्णूला प्रशिक्षण द्यायचे आहे. सर्व वॉलीवरही थोडी मेहनत घ्यायची आहे, असेही पेसने नमूद केले.
पदकाची गॅरंटी नाही : सानिया- लंडन ऑलिम्पिक पदक जिंकण्याची गॅरंटी नाही. पदकाचे आश्वासन मी देऊ शकत नाही. मात्र, मी स्पध्रेत माझ्याकडून सर्वर्शेष्ठ खेळ करण्याचा निश्चित प्रयत्न करीन, अशी प्रतिक्रिया सानिया मिर्झाने व्यक्त केली. ऑलिम्पिकमध्ये सानिया महिला दुहेरीत रश्मी चक्रवर्तीसोबत तर मिर्श दुहेरीत लिएंडर पेससोबत सहभागी होत आहे. एका कार्यक्रमात सानिया म्हणाली, ‘मी स्वत:वर पदकासाठी दबाव टाकू इच्छित नाही. आधीच प्रत्येक खेळाडूवर ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा दबाव असतो. मी सवरेत्तम खेळ करेन,’ असे तिने म्हटले.