नवी दिल्ली- भारतीय डेव्हिस चषक टीमचा खेळाडू युकी भांबरीने आठवड्यात शानदार कामगिरी करून एटीपी क्रमवारीत प्रगती केली. त्याने आपल्या क्रमवारीत तब्बल 29 स्थानांनी सुधारणा केली. आता तो पुरुष एकेरीच्या क्रमवारीत 145 व्या स्थानी विराजमान झाला.
युकीने भारताचा पुरुष एकेरीतील सोमदेवला पराभूत केले. यासह त्याने करिअरमधील सर्वाेत्कृष्ट स्थानही निश्चित केले. डबल्सचा किताब जिंकून त्याने दुहेरीच्या क्रमवारीत 143 वे स्थान गाठले. सोमदेवने तीन स्थानांनी सुधारणा केली. त्याने 100 व्या स्थानावर धडक मारली.
साकेत, सनम, -श्रीरामची प्रगती
साकेत मिनेनी, सनम व बालाजीने क्रमवारीत प्रगती केली. मिनेनीने 23 स्थानांनी क्रमवारीत सुधारणा केली. त्याने आता 292 वे स्थान गाठले. सनमने 350 आणि एन. बालाजीने 375 व्या स्थानी धडक मारली.