आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis No 1 Novak Djokovic Engaged To Jelena Ristic

टेनिस नंबर 1 खेळाडूने केला गूपचूप साखरपुडा... गर्लफ्रेंडला घरी घेऊन जाण्‍याची केली तयारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- टेनिस विश्‍वातील सुपरहिरो नोव्‍हाक जोकोविच लवकरच एका आयुष्‍यातील एक नवा टप्‍पा गाठणार आहे. सर्बियाई मीडियामध्‍ये आलेल्‍या वृत्‍तानुसार जोकोविचने आपली गर्लफ्रेंड जेलेना रिस्टिकशी गूपचूप साखरपुडा केला आहे.

प्रत्‍येक सामन्‍यावेळी त्‍याला प्रोत्‍साहन देणा-या जेलेनाला जोकोविचने मोन्‍टे कार्लो येथे प्रपोज केले. जेलेना आणि नोव्‍हाक गेल्‍या 8 वर्षांपासून डेटिंग करीत आहेत. जोकोविचने आपल्‍या फेसबुक पेजवर साखरपुडयाच्‍या वृत्तास दुजोरा दिला आहे. या वृत्तानुसार नोव्‍हाक 2014मध्‍ये लग्‍न करण्‍याची शक्‍यता आहे.

नोव्‍हाक जोकोविच टेनिस जगतातील एक चर्चित चेहरा आहे. जगभरातील युवती त्‍याच्‍या क्‍यूट स्‍माईलवर फिदा आहेत. जेलेनाबरोबरील त्‍याच्‍या मैत्रीमुळे आधीच लाखो मुलींचे त्‍याने मन मोडले होते. या वृत्तामुळे त्‍यांना अधिकच धक्‍का बसला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा जोकोविचच्‍या प्रेमाचा प्रवास...