आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis Star Maria Sharapova Doesn\'t Know Sachin Tendulkar, Divya Marathi

रशियाची गोल्‍डनगर्ल मारिया शारापोव्‍हाच्‍या विरोधात जड्डूनेही ठोकला शड्डू!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकरला मी ओळखत नाही, असे वक्तव्य रशियाच्‍या गोल्डनगर्ल मारिया शरापोव्हाने केल्यानंतर सबंध क्रीडाक्षेत्रामधून याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त होत आहे. सोशल साईट्वर तिची खिल्‍ली उडविली जात आहे. यामध्‍ये भारताचा अष्‍टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाला राग अनावर झाला असून त्‍याने ट्विटरवर शारापोव्‍हाचा फोटो अपलोड करुन कोण ही मारिया? असा सवाल केला आहे.
मास्‍टर ब्‍लॉस्‍टर सचिन तेंडुलकरचे टेनिसप्रेम सर्व जगाला माहित आहे. तेंडुलकर न चुकता विम्‍बल्‍डनच्‍या स्‍पर्धा बघायला इंग्‍लडला जात असतो. 28 जून रोजी सचिन तेंडुलकर, माजी फुटबॉलपटू डेविड बॅकहम आणि गोल्फपटु इयॉन पॉल्‍टर सोबत सेंट्रल कोर्टमध्‍ये प्रेक्षक गॅलरीमध्‍ये बसून सामन्‍याचा आनंद घेत होते.

सचिनला नाही ओळखत
फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहॅम, गोल्फपटू इयॉन पॉल्टर व ऍन्ड्रय़्रू स्ट्रॉस यांचा प्रेक्षक गॅलरीमध्‍ये बसले आहेत याबाबत शारापोव्हाला माहिती देण्यात आली, तुला सचिन तेंडुलकर माहिती आहे का’, असा प्रश्न विचारला गेला असता शरापोव्हाने त्याचे नकारार्थी उत्तर दिले. तिने बेकहॅमबद्दल कल्पना आहे. पण, सचिनबद्दल माहिती नाही, असे सांगितले.
जड्डुचा शड्डु
भारताचा अष्‍टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने आपल्‍या ट्विटर अकाऊंडवर शारापोव्हाने नेटला पाय लावलेला तसेच सचिन मैदानाला स्पर्श करत असल्याचे एकत्रित छायाचित्र अपलोड केले आहे. त्‍याखाली मारिया शारापोव्‍हा कोण आहे? क्रिकेटचा महानायक सचिनची मैदानाप्रती असलेली भावना शिका असा सल्‍लाही दिला आहे.
नेटीझन्‍सचा हल्‍लाबोल
टि्वटरवर मुंबई ट्रेंड्समध्ये आज ‘Who is Maria Sharapova?’ पहिल्या क्रमांकावर ट्रेंड्स होत आहे. एकूनच ऑनलाईन विश्वात क्रिकेटचा देव सचिनला ओळखत नसल्याबाबत मारियावर टीकेची झोड उडली आहे. फेसबुकवरही ‘Who is Maria Sharapova?’नावाचे पेज बनविण्यात आल्याचे दिसून येत आहे. याद्वारे नेटीजन्स मारियावर शाब्दिक हल्लाबोल करीत आहेत.

पुढील स्‍लाडवर पाहा, रवींद्र जेडजाने केलेले ट्वीट