(फोटो - टेनिस स्टार मार्टिना नवरातिलोवा(उजवीकडे) गर्लफ्रेंउ जूलियासोबत)
न्यूयॉर्क - 18 ग्रँड स्लॅम जिंकणारी 57 वर्षीय मार्टिना नवरातिलोवा गर्लफ्रेंड जूलियासमवेत लग्न करणार आहे. मार्टिनाने युएस ओपन पुरुष एकेरी सेमीफायनलमध्ये 42 वर्षीय जूलियाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. जूलियानेसुध्दा तिच्या प्रेमाचा स्विकार केला.
उल्लेखनिय म्हणजे मार्टिनाने 2010 मध्ये
आपली पहिली महिला मैत्रिण टोनी लेयटनसोबत झालेल्या घटस्फोटामुळे एक कोटी 80 लाखांचा दंड भरला होता. मार्टिनाचे यापूर्वीही काही
महिलांसोबत अफेअर होते.
मार्टिना आणि जूलिया यावर्षाच्यासुरुवातीला सोबत दिसल्या.त्यानंतर विभिन्न इव्हेंटमध्ये त्या सोबत-सोबत दिसल्या. लग्नासाठी मार्टिन प्रपोज करेल अशी कुणालाच आशा नव्हती.
ट्विटरवर मानले आभार
मार्टिनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करुन चाहत्यांचे आभार मानले. तसेच 'आम्ही दोघी एका कुटुंबाप्रमाणे राहत आहोत' असेही ट्विट केले.
पुढील स्लाइडवर वाचा, मार्टिनाने केलेले ट्वीट..