आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis Star Sania Mirza Appointed Brand Ambassador Of Telangana

सानिया मिर्झा तेलंगणाची ब्रँड अँम्बेसेडर, मुख्‍यमंत्री चंद्रशेखर राव यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवनिर्मित तेलंगणा राज्याची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून टेनिसपटू सानिया मिर्झा हिची नेमणूक करण्यात आली आहे. ब्रँड अँम्बेसेडर म्‍हणून तेलंगणा राज्‍याचे नवे मुख्‍यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सानिया मिर्झाच्‍या नावाची घोषणा केली. प्रथम क्रमांकाची टेनिस स्‍टार सानिया मिर्झाने फेसबुकवर आपल्‍याला ब्रँड अँम्बेसेडर करण्‍यात आले असल्‍याची माहिती दिली. मुख्‍यमंत्री यांनी ब्रँड अँम्बेसेडर म्‍हणून निवड केल्‍यानंतर सानिया मिर्झाला एक कोटी रूपयांचा चेक प्रदान केला.
देशविदेशात नव्या राज्याचा प्रचार ती करील, असे यावेळी मुख्‍यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितले. तेलंगणाची पहिली ब्रँड अँम्बेसेडर होण्याचा मान मला मिळाला याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो, असे मत सानियाने ट्विटरवर नोंदवले आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा फेसबुकवरील सानियाच्‍या प्रतिक्रीया...