आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terry Walsh Resign As Chief Coach Of Indian Hockey Team

सुवर्णपदक मिळवून देणा-या हॉकी प्रशिक्षकांनी नाराज होऊन दिला राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आशियाई स्‍पर्धेत भारताला हॉकीमध्‍ये सुवर्णपदक मिळवून देणा-या प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी आज (मंगळवार) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. करार संपल्‍यानंतर पुढील कार्याद्दल काही सुतोवाच न झाल्‍यामुळे त्‍यांनी राजीनामा देण्‍याचा निर्णय घेतला.

भारतीय हॉकी संघाने माझ्यापुढे काही अटी ठेवल्या होत्या. या अटी पूर्ण न करता आल्यामुळे मी पदाचा राजीनामा देत असल्‍याचे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक टेरी वॉल्‍श यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये सांगितले.
वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघाने आशियायी स्पर्धेत सुवर्ण पदक कामगिरी केली होती. ऑस्‍ट्रेलियाहून परतल्‍यानंतर वॉल्श यांचा कार्यकाल 19 नोव्हेंबर रोजी संपणार होता. पुढील कार्यकालाबाबत काहीही न सांगितल्यामुळे ते कंटाळले होते. अखेर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला ते जाणार आहेत.