आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसोटी खेळवली जाणार आता दिवस-रात्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या लॉर्ड्स, लंडन येथील दोन दिवसांच्या बैठकी कसोटी दिवसरात्र खेळवण्याची शिफारस केली आहे. यासाठी दोन्ही संघाची संमती असावी लागणार आहे. त्यासाठी दिवसा वेगळा व रात्रीसाठी वेगळ्या रंगाचे चेंडू वापरल्या जाणार आहे.

तसेच क्रिकेट या खेळाच्या विकासासाठी, संरक्षणासाठी आयसीसीने कायम अग्रेसर आणि सावध राहिले पाहिजे, असा सूर सर्वांनी काढला. ट्वेंटी-20 क्रिकेटला 19 वर्षांखालील वयोगटापासून दूर ठेवण्याची, तसेच डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम एकदिवसीय व कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांसाठी लागू करावी, अशी शिफारस क्रिकेट समितीने केली. डकवर्थ-लुईस यंत्रणेऐवजी भारतीय वंशाच्या व्ही. जयदेवन यांनी सुचवलेल्या नव्या यंत्रणेच्या वापराची सध्या तरी गरज वाटत नसल्याचे समितीने स्पष्ट केले. भारताचा आक्षेप असलेल्या बॉल ट्रॅकिंग यंत्रणेतील अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून दर्जा सुधारला असल्याचे समितीचे मत पडले. अवैध अँक्शनने गोलंदाजी करणार्‍या गोलंदाजांची अँक्शन पकडण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याची तयारी आयसीसीने दर्शवली आहे. महत्त्वाच्या शिफारशी -

दिवस-रात्र

भारत, न्यूझीलंड व द.आफ्रिका या देशांमध्येच याचा वापर होऊ शकतो.

उभय देशांच्या संमतीने प्रायोगिक तत्त्वावर दिवस-रात्र कसोटीचे आयोजन करावे.

गोलंदाज गोलंदाजी करताना अवैध अँक्शन टिपण्यासाठी प्रोटोटाइप सेन्सरचा वापर करण्यात येणार आहे.

पंचांना अधिक अचूक व योग्य निर्णय घेण्यासाठी डीआरएस यंत्रणा सहायक म्हणून वापरण्यात येते. त्यामुळे सर्वच देशातील संघासाठी ती लागू असावी.

ट्वेंटी -20 क्रिकेट

प्रत्येक दोन वर्षांनी ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धा घ्यावी.

पुरुष व महिलांसाठी एकाच वेळी स्पर्धा व्हावी.

2014च्या विश्वचषकापासून 12 ऐवजी 16 संघांचा समावेश.

19 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी आयसीसी ट्वेंटी-20 स्पर्धा नाही.

एकदिवसीय क्रिकेट

50 षटकांचे क्रिकेट अधिक आकर्षक करावे.

पॉवरप्ले पहिल्या 10 षटकांसाठी सक्तीचा. नंतर 5 षटकांचा बॅटिंग पॉवरप्ले 40 षटकांपूर्वी घेणे अनिवार्य.

पॉवरप्ले नसताना 30 यार्ड वतरुळाबाहेर फक्त चारच क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा.

आखूड टप्प्याच्या चेंडूंना षटकात एकाऐवजी दोन चेंडू टाकण्यास मंजुरी.

कसोटी क्रिकेट
कसोटी क्रिकेट अधिक स्पर्धात्मक व्हायला लागले असून पहिल्या पाच क्रमांकांच्या संघातील कमी-कमी गुणांचे अंतर ती गोष्ट स्पष्ट करते.

मात्र कसोटी क्रिकेटमध्ये तळाच्या पाच संघांची कामगिरी उंचावणे गरजेचे.

रिव्ह्यू किंवा रेफरल डिसिजनच्या वेळी, ‘ड्रिंक्स ब्रेक’ वगळता मैदानावर शीतपेयस मज्जाव.

तिसर्‍या पंचांच्या निर्णयानंतर तत्काळ खेळ सुरू करावा.

फलंदाजी करणार्‍या संघाच्या दिरंगाईच्या वेळेच नोंद ठेवली जाणार.