आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दुबई - भारताचा युवा फलंदाज चेतेश्वर पुजारा, ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी कसोटी क्रमवारीत जोरदार प्रगती केली आहे. दोघांनी नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी केली होती. पुजाराने 12 व्या हून सातव्या क्रमांकावर झेप घेतली असून, अश्विनने गोलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. अश्विनची ही कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ क्रमवारी आहे.
सौराष्ट्राच्या पुजाराने कोटलाच्या दुसºया डावात नाबाद 82 धावा ठोकून भारताला विजय मिळवून दिला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दोन स्थांनाची प्रगती करताना 24 हून 22 वे स्थान मिळवले आहे. धोनीसोबत वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज गेलसुद्धा याच क्रमांकावर आहे. तामिळनाडूच्या मुरली विजयने तीन स्थानांच्या प्रगतीसह 40 वे स्थान गाठले आहे.
रविचंद्रन अश्विन बहरला
गोलंदाजीत कोटलावर एका डावात पाच गडी बाद करून एकूण 7 विकेट घेणारा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन दोन स्थानांच्या प्रगतीसह सहाव्या क्रमांकावर आला आहे. अश्विनची ही
कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ रँकिंग ठरली आहे. त्याच्या नावे सध्या 757 गुण आहेत.
जडेजाने मारली 8 स्थानांची उडी
कोटला कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसºया डावात 5 गडी बाद करून सामन्यात 7 विकेट घेणारा सौराष्ट्राचा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने आठ स्थानांची प्रगती केली आहे. तो आता 27 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ईशांत शर्मा तीन स्थानांच्या सुधारणेसह 31 व्या क्रमांकावर आहे. प्रग्यान ओझाच्या क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली असून, तो दहाव्या क्रमांकावर आहे.
फलंदाजांची क्रमवारी
क्र. फलंदाज गुण
1 हाशिम आमला 903
2. एस. चंद्रपॉल 880
3. एल्बी डिव्हिलर्स 879
4. कुमार संगकारा 866
5. मायकेल क्लार्क 860
6. अॅलेस्टर कुक 792
7. चेतेश्वर पुजारा 777
8. जॅक कॅलिस 756
9. युनूस खान 748
10. मॅट प्रायर 745
गोलंदाजांची क्रमवारी
क्र. गोलंदाज गुण
1. डेल स्टेन 905
2. फिलेंडर 890
3. रंगना हेराथ 831
4. एस. अजमल 819
5. पीटर सिडल 776
6. आर. अश्विन 757
7. जेम्स अँडरसन 740
8. ग्रीम स्वान 733
9. मोर्ने मोर्केल 715
10. प्रज्ञान ओझा 706
कसोटी क्रमवारी
क्र. देश गुण
1 द.आफ्रिका 128
2 इंग्लंड 114
3 भारत 112
4 ऑस्ट्रेलिया 110
5 पाकिस्तान 104
6 श्रीलंका 92
7 वेस्ट इंडीज 92
8 न्यूझीलंड 83
9 बांगलादेश 01
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.