आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Test Records After Defeat Of Australian Team In Delhi's Feroz Shah Kotla Ground

कांगारूंच्या या लाजीरवाण्या पराभावानंतर बनले हे 10 विक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 4-0 असे लोळवल्यानंतर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम नोंदवले गेले. यातील बहुतेक विक्रम भारतीय टीमच्या नावावर गेले आहेत.

टाकूया एक नजर या कसोटी मालिकेनंतर झालेल्या विक्रमाबाबत-
कांगारू टीमसोबत क्रिकेट खेळण्याच्या 65 वर्षांच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला 4-0 ला हरवले आहे. याआधी भारताने 1992-93 आणि 2009-10 मध्ये सलग चार सामने जिंकले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे की, एखाद्या संघाने दुस-या संघाला प्रथम 4-0 ने हरविले आणि त्यानंतर हरलेल्या संघाने त्याला संघाला 4-0 असे धुऊन काढत पराभवाचा बदला घेतला.

44 वर्षाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाला कोणातरी 4-0 असे हरविले आहे. याआधी 1969-70 मध्ये दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 4-0 असे हरविले होते. याचबरोबर नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीतही एक वेगळाच रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. असे पहिल्यांदाच घडले आहे की, सलग चार कसोटीत व संपूर्ण मालिकेत एकच संघ नाणेफेक जिंकला व ते चारही सामने संघ हारला. धोनीही हा असा पहिला कर्णधार बनला आहे ज्याने सलग चार कसोटीत नाणेफेक जिंकून सलग चार कसोट्या जिंकून दाखवल्या आहेत.

फिरोजशहा कोटलाच्या मैदानावर भारताने 32 पैकी 12 कसोटी विजय मिळवले आहे. भारतात सर्वाधिक विजय मिळवणार्‍या एम. ए. चिदंबरम स्टेडियम (31 पैकी 13 विजय) कोटला हे दुसरे यशस्वी स्टेडियम ठरले आहे. कोटलावर मागच्या दहा लढतीत भारताने 9 विजय आणि एक सामना ड्रॉ केला. तसेच कोटलावर भारताने मागील 20 वर्षापासून एकही सामना गमावला नाही.


भारताने दुस-यांदा कांगारूना तिस-या दिवशी पराभावाची चव चाखायला लावली. याआधी भारताने नोव्हेंबर 2004 मध्ये मुंबईत झालेल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा तिस-या दिवशीच फडशा पाडला होता.

भारताने कंगारूच्या टीमला 2008-09 मध्ये 2-0, 2010-11 मध्ये 2-0 आणि 2012-13 मध्ये 4-0 असे हारवत विजयी मालिकेची हॅट्ट्रिक साधली आहे. ऑस्ट्रेलियाचे हे सर्वाधिक खराब खेळ ठरला आहे. याआधी कांगारू टीम 1967 मध्ये दक्षिण अफ्रिकेत 4-0, या मालिकेत भारताकडून 4-0, 1886 मध्ये इंग्लंडमध्ये 3-0 आणि 1982-83 मध्ये पाकिस्तानकडून 3-0 अशी हारली आहे.

नथन लॉयनने दिल्ली कसोटीत 7/94 असे आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. याआधी श्रीलंकेविरोधात 5/34 अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

कोणत्याही मालिकेतील ऑस्ट्रेलियन सलामीचा फलंदाज म्हणून डेविड वॉर्नरची सर्वात खराब कामगिरी झाली आहे. त्याने आठ डावात 24.37 च्या सरासरीने केवळ 195 धावा केल्या आहेत. शेन वॉटसनसाठीही ही मालिका खूपच खराब राहिली. त्याने सहा डावात 16.50 च्या सरासरीने फक्त 99 धावा केल्या आहे. ही त्याची आतापर्यंत सर्वात खराब कामगिरी आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन एका सामन्याच्या दोन्ही डावांत अर्धशतक ठोकणारा पीटर सिडल पहिला फलंदाज ठरला आहे. पहिल्या डावात त्याने 51 तर दुसर्‍या डावात 50 धावा काढल्या. दोन्ही डावात ऑस्ट्रेलियाकडून तो टॉप स्कोअरर ठरला, हे विशेष. भारताकडून आर. अश्विनने मालिकेत सर्वाधिक 29 बळी घेतले.

धोनीने मायदेशात ऑस्ट्रेलियाला सलग आठ कसोटी सामन्यात पराभव करण्याचा विक्रम केला आहे. तसेच असा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच भारताला सर्वांधिक विजय मिळवून देणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली 47 पैकी 24 कसोटी जिंकल्या आहेत. तर, 12 कसोटीत पराभव व 11 कसोट्या अनिर्णित राखल्या आहेत. धोनीच्या कसोटी क्रिकेटमध्ये 51.06 अशी सर्वोत्तम सरासरी आहे.

भारताच्या पहिल्या डावात 43 धावा काढणार्‍या रवींद्र जडेजाने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात 5 गडी बाद केले. कारकीर्दीतील ही त्याची सवरेत्तम कामगिरी ठरली. त्याने पहिल्या डावातसुद्धा 2 गडी बाद केले होते. एकून कसोटीत सात बळी घेत आपले गोलंदाजीतील सर्वोत्तम प्रदर्शन केले. याआधी त्याची सर्वोत्तम कामगिरी हैदराबाद कसोटीत (6-66) असे होते.