आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल, कर्ण, रैनाची "कसोटी' , ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी भारतीय क्रिकेट संघात तिघांची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी सोमवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यात २२ वर्षीय सलामीवीर लोकेश राहुल आणि २३ वर्षीय फिरकीपटू कर्ण शर्मा यांना संधी देण्यात आली आहे. दोघांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. सुरेश रैनाचे सप्टेंबर २०१२ नंतर प्रथमच कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात या तिघांची वेगवान खेळपट्यांवर कसोटीच असेल. मालिकेतील पहिला कसोटी सामना ४ डिसेंबर रोजी ब्रिस्बेन येथे खेळवला जाईल.

ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी कसोटी संघाची आणि श्रीलंकेविरुद्ध उर्वरित दोन वनडेंसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी धोनी कर्णधार असेल. मात्र, तो दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत विराट कोहली संघाचे नेतृत्व करेल. धोनी सध्या उजव्या हाताच्या कोपरातील दुखापतीमुळे त्रस्त आहे.

वेगवान गोलंदाजांची दुखापत गंभीर नाही
शमी आणि वरुण अॅरोन दुखापतीमुळे सध्या वनडे संघातून बाहेर आहेत. ईशांत शर्मानेसुद्धा तिस-या वनडेत केवळ चार षटके गोलंदाजी केली. तिघांची दुखापत गंभीर नसल्याचे मंडळाने सांगितले.
लंकेविरुद्ध वनडे संघात तीन बदल
श्रीलंकेविरुद्ध सध्या खेळत असलेल्या वनडे संघात बीसीसीआयने तीन बदल केले. सलामीवीर शिखर धवन, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वृद्धिमान साहा यांना विश्रांती देण्यात आली आहे. या तिघांच्या जागी रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा आणि महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधवचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारत या मालिकेत ३-० ने पुढे आहे.
वनडे संघ (श्रीलंकेविरुद्ध उर्वरित दोन वनडेसाठी)
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अंबाती रायडू, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, विनयकुमार, केदार जाधव
कसोटी संघ (ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी)
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, नमन ओझा, आर. अश्विन, कर्ण शर्मा, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, वरुण अॅरोन.
पुढे वाचा, सेहवागचा खेळ खल्लास...