आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thailand Badminton Spardha Jwala Gutta And Prajcta Sawant

पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंची निराशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक- येथील थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी घोर निराशा केली. ज्वाला गुट्टा व प्राजक्ता सावंतने महिला दुहेरीच्या पात्रता फेरीत चलदचलम चयनित - फ्तईमास मोएवांगला वॉकओव्हर दिला.

पुरुष एकेरीच्या क्वालिफिकेशनच्या पहिल्या फेरीत श्रेयांस जायस्वालने विजय मिळवला. त्याने मलेशियाच्या खेईसियांग तोहवर 21-17, 21-13 अशा फरकाने मात केली. त्याने अवघ्या 26 मिनिटांमध्ये सामना आपल्या नावे केला. यासह त्याने दुसºया फेरीतील प्रवेश निश्चित केला. मात्र त्याला थायलंडच्या नानपाकोर्नने पराभूत केले. थायलंडच्या खेळाडूने 21-12, 21-19 ने विजय मिळवला. दुसरीकडे प्रेमसिंग चौहान, मनीष गुप्ता, नीरज वसिष्ठ, बन्सल आणि गौरव वेंकटला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. मिश्र दुहेरीत अब्दुल लतीफ व प्राजक्ता सावंत ही जोडीही पहिल्या फेरीत पराभूत झाली. बुधवारपासून स्पर्धेच्या मुख्य ड्रॉला प्रारंभ होत आहे.