आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती केवळ अफवाच : रमीज राजा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मी आणि वसीम अक्रम समालोचन सोडून पाकिस्तानात परत जात असल्याची अफवा आहे. एका टीव्ही चॅनलची ही चूक दिसते, असे पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार रमीज राजाने ‘दिव्य मराठी’शी दूरध्वनीवर बोलताना सांगितले. भारत-इंग्लंड वनडे मालिकेसाठी स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी हिंदीचे समालोचक म्हणून रमीज राजा सध्या भारतातच आहेत. कोची येथील भारत-इंग्लंड वनडे सामन्यानंतर मी आणि आमच्या समालोचकांची टीम सध्या नवी दिल्लीत आहे. तिस-या वनडेसाठी आम्ही गुरुवारी दिल्लीहून रांचीकडे रवाना होणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

दोन्ही देशांत सध्या बिघडलेले संबंध आणि खेळातील राजकारणाच्या हस्तक्षेपाबद्दल विचारले असता त्यांनी या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या हिंदी समालोचनासाठी टीममध्ये कपिलदेव, नवज्योतसिंग सिद्धू, रमीज राजा, अयाज मेमन, सौरव गांगुली, वसीम अक्रम, अरुण लाल या दिग्गजांचा समावेश आहे.