आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thats Why Irfan Ahead From Pravinkumar & Munaf Patel

... म्हणून इरफान ठरला प्रवीण, मुनाफला वरचढ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विनयकुमार जखमी झाल्यामुळे आगामी श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियात इरफान पठाणला संधी देण्यात आली. विनय जखमी झाल्यानंतर मुनाफ किंवा प्रवीणकुमारलाही संधी मिळू शकली असती. मात्र, निवड समितीने इरफानला प्राधान्य दिले. गेल्या काही दिवसांत मुनाफ आणि प्रवीणच्या तुलनेत इरफानने चांगली कामगिरी केल्याने निवड समितीने त्याच्याकडे पारडे झुकवले.
इरफानमध्ये काय विशेष- आशिया चषकाच्या तीन सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. फेब्रुवारी 2009 मध्ये भारतीय संघाबाहेर झाल्यानंतर इरफानने डिसेंबर 2011 मध्ये भारतीय संघात पुनरागमन केले. त्यावेळी वेस्ट इंडीजविरुद्ध एकमेव वनडे खेळल्यानंतर आॅस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेसाठी तो संघात होता. मात्र, त्याचे पुनरागमन केवळ सात वनडेसाठी राहिले. तो पुन्हा संघाबाहेर झाला. प्रवीणनने आशिया चषकाच्या तीन सामन्यांत 5 विकेट घेतल्या. मात्र, त्याच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव होता. श्रीलंकेतील खेळपट्ट्या मध्यमगती गोलंदाजांसह स्विंग गोलंदाजांनाही अनुकूल असतात. या दोन्ही इरफान तरबेज आहे. गेल्या काही दिवसांतील त्याची कामगिरीही चांगली ठरली. 2012 मध्ये 7 वनडेत त्याने 11 विकेट घेतल्या. या काळात त्याने चांगली फलंदाजीही केली. श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्बेन येथे त्याने 47 धावांची उपयुक्त खेळी केली होती. अष्टपैलू कामगिरीच्या आधारे त्याची श्रीलंका दौ-यासाठी निवड झाली.
लंकेत खेळल्याचा फायदा होईल- श्रीलंकेतील आगामी वनडे मालिकेत खेळण्याचा फायदा येत्या सप्टेंबरमध्ये होणाºया विश्वचषक टी-20 स्पर्धेत होईल, असे मत मुंबईतील एका कार्यक्रमात इरफान पठाणने व्यक्त केले. श्रीलंकेत खेळल्यामुळे विश्वचषकाच्या वेळी आम्हाला वातावरणाशी एकरूप होण्यास मदत होईल. मला संधी मिळाल्याने मी आनंदी आहे, असे तो म्हणाला.
आयपीएलमध्ये इरफान - नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेत (आयपीएल-5) खेळलेल्या 17 सामन्यांत त्याने 8 विकेट घेतल्या. आशिया चषकात 5 विकेट घेतल्या होत्या.
प्रवीणचीही सुमार कामगिरी : प्रवीणकुमारच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो. 2012 च्या 12 वनडेत त्याने 8 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये तो केवळ 9 विकेट घेऊ शकला. सुमार दर्जाचे फिटनेस ही सुद्धा प्रवीणसाठी अडचण ठरली. फिटनेसकडे केले दुर्लक्ष त्याला महागात पडले.
मुनाफची सुमार कामगिरी : गेल्या काही दिवसांत मुनाफची कामगिरी चांगली झाली नाही. आयपीएलमध्ये 15 विकेट घेतल्या असल्या तरीही एक तळाचा फलंदाज म्हणून तो पूर्णपणे अपयशी ठरला. 2012 मध्ये त्याला एकही वनडे सामना खेळण्याची संधी मिळू शकली नाही. 2011 मध्ये 8 वनडेत त्याने 10 विकेट घेतल्या होत्या.
इरफान टी-20 साठी लाभदायक खेळाडू : गावसकर