आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'The Best All rounder' Award Presented To Abhishek Nayar

‘सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू’ पुरस्कार अभिषेक नायरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-वर्ष 2012-13चा भारतातील स्थानिक क्रिकेट हंगामातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार (लाला अमरनाथ पुरस्कार) मुंबईच्या अभिषेक नायरने पटकावला, तर याच कालावधीतील भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठीचा पॉली उम्रीगर पुरस्कार फिरकी गोलंदाज आर. अश्विनने पटकावला. बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये भारताचा सर्वोत्तम कसोटीपटू होण्याचा बहुमान मुंबईच्या रोहित शर्माने पटकावला आहे. मुंबईत 11 जानेवारीला या पुरस्कारांचे वितरण होईल. त्या वेळी वयोवृद्ध क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचा तसेच फारुख इंजिनिअर व एकनाथ सोलकर यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह व प्रत्येकी 15 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. कपिलदेवला 25 लाखांचा सी. के. नायडू यांच्या नावाने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.
रोहित शर्मा, अभिषेक नायर या दोन मुंबईकरांसह अरमान जाफरने एम. ए. चिदंबरम ट्रॉफी पटकावून 16 वर्षांखालील सर्वोत्तम क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला आहे.

पुरस्कार विजेते खेळाडू असे आहेत
पुरस्कार विजेता
१ कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार पिलदेव
१ पॉली उम्रीगर पुरस्कार द्रन अश्विन
१ लाला अमरनाथ पुरस्कार प्रेषेक नायर (मुंबई)
१ माधवराव शिंदे पुरस्कार जीवनज्योतसिंग
१ माधवराव शिंदे पुरस्कार ईश्वर पांडे (मध्य प्रदेश)
१ चिदंबरम ट्रॉफी (25 वर्षांखालील) करण शर्मा (रेल्वे)
१ चिदंबरम ट्रॉफी (19 वर्षांखालील) अक्षर पटेल (गुजरात)
१ चिदंबरम ट्रॉफी (16 वर्षांखालील) अरमान जाफर (मुंबई)
१ चिदंबरम ट्रॉय सर्वोत्कृष्ट एम. डी. तिरुक्षकामिनी
१ सर्वोत्कृष्ट पंच सी. समशुद्दीन
१ दिलीप सरदेसाई पुरस्कार रोहित शर्मा (मुंबई)
१ सर्वोत्कृष्ट संघ मुंबई क्रिकेट संघ