आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Great Khali Needs To Learn Lot Says Raj Kundra

'द ग्रेट खली'ला अजून बरेच शिकावे लागेलः राज कुंद्रा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलनंतर प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांनी पश्चिमेकडील देशांप्रमाणेच भारतातही फाईट लिग सुरु केली आहे. परंतु, आश्‍चर्याची गोष्‍ट म्‍हणजे या क्षेत्रात दरारा असलेला भारतातील एक दिग्‍गच फायटर 'खली द ग्रेट' याला कुंद्रा यांनी आपल्‍या कंपुत घेतले नाही. यासंदर्भात विचारले असता कुंद्रा यांनी खलीला आणखी शिकण्‍याची गरज असलचे मत व्‍यक्त केले.
'मिक्‍स्ड मार्शल आर्ट्स' हा खुल्‍या कुस्‍तीचाच काहीसा वेगळ प्रकार आहे. कुंद्रा यांनी पश्चिमेकडे हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. भारतातही प्रचंड चाहते आहेत. स्‍वतः कुंद्रा हे काही वर्षांपासून हा खेळ मोठ्या चवीने पाहत आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी भारतात सुपर फाईट लिग सुरु करण्‍याचा निर्णय घेतला. खलीबाबत विचारल्‍यावर ते म्‍हणाले, खली हा एक कुस्‍तीपटू आहे. सुपर फाईट हा काहीसा वेगळा प्रकार आहे. त्‍याला या खेळाबाबत शिकावे लागेल, या खेळातील बारकावे समजून घ्‍यावे लागतील. त्‍यानंतर त्‍याने यात यावे.
राज कुंद्रा यांना भारतातील खेळाडुंकडून ब-याच अपेक्षा आहेत. तसेच पंजाबमधून लढवय्ये समोर यावे, अशी मनोमन इच्‍छा असल्‍याचे कुंद्रा सांगतात. राज कुंद्रा हे अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी हिचे पती आहेत. सर्वप्रथम त्‍यांनी आयपीएलमध्‍ये राजस्‍थान रॉयल्‍सची मालकी घेतली.
सर्वात भ्रष्ट नेत्याविरुद्ध निवडणूक लढवीन : खली
भारतात लवकरच डब्ल्यूडब्ल्यूई सामन्यांचे आयोजन : खली
अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ द ग्रेट खली मैदानात !