लंडन - ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वार्न आणि गर्लफ्रेंड एमिली स्कॉट तीन महिन्यापासून विभक्त आहेत. एमिली अपत्य हवे होते आणि आणि पिता बनू इच्छित नव्हतो म्हणून आम्ही विभक्त झाल्याचे वॉर्नने सांगितले होते.
वॉर्नची पहिली पत्नी सिमोनला तीन मुले आहेत. वॉर्न म्हणाला की, 'एमिली चांगली महिला असून आमच्या वैयक्तिक मतभेदांमुळे आम्ही विभक्त झालो' एमिली पेशाने डीजे असून ती वॉर्न पेक्षा 15 वर्षांनी लहान आहे.
शेन वॉर्न
आपल्या खासगी आयुष्यामुळे फार चर्चेत राहिला आहे. ड्रग्जमुळे बंदी, पत्नी सिमोनसोबत घटस्फोट, लिज हर्लेसोब अफेअर अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील.
सोशल साइटवर व्यक्त केले होते प्रेम
शेन वॉर्नने गर्लफ्रेंड स्कॉटसोबतचे अफेअर अगदी चित्रपटाप्रमाणे केले होते. त्याने सोशल साइटवर त्याच्या प्रमाची स्पष्टोक्ती दिली होती.
150 पाहूण्यांसमोर घेतले चूंबन
वॉर्न आणि 30 वर्षीय मॉडेल एमिली यांनी जेफ के यांच्या 50 वाढदिवसाच्या पार्टीमध्ये 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत एकमेकांचे चुंबन घेतले होते. उल्लेखनिय म्हणजे काही दिवसांपूर्वीज वॉर्नची पहिली पत्नी सिमोनच्या वडिलांनी लिज हर्ले सोबतचे वॉर्नचे लग्न तोडले होते.
15 वर्षांनी लहान आहे स्कॉट
एमिली स्कॉट वॉर्नपेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. वॉर्नची माजी प्रेयसी लिज हिर्ले त्याहून 18 वर्षांनी लहान होती.
भारतासोबत खास नाते
शेन वॉर्नचे भारतासोबत खास नाते आहे. त्याने आपल्या कसोटी करिअरची सुरुवात भारतापासून केली होती. तसेच आयपीएलच्या पहिल्या पर्वामध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषविले होते. त्यामध्ये तो यशस्वी राहिला होता. राज्यस्थानला त्याने किताबही मिळवून दिला होता.
क्रिकेट करिअर
* 145 टेस्टमध्ये 708 विकेट
* 194 एकदिवसीयमध्ये विकेट