आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Rock And Ronda Rousey Confront The Authority

एकीने रॉकला श्रीमुखात दिली, तर दुसरीने ट्रिपल एचला...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: द रॉकला श्रीमुखात देताना स्टेफनी मॅकमहोन.
मियामी - डब्ल्यूडब्ल्यूईच्या रसेलमानिया इव्‍हेंटमध्‍ये पैलवान आणि हॉलीवूड अभिनेता स्टार द रॉकला (ड्वेन जॉन्सन)स्टेफनी मॅकमहोनने जोरात श्रीमुखात दिली. या घटनेने उपस्थित प्रेक्षक अवाक झाले होते. मात्र हा प्रसंग येथेच संपत नाही, सुपर फायटर रॉंड रौसीने दिग्गज पैलवान ट्रिपल एचला श्रीमुखात देऊन खाली पाडले.मात्र द रॉक आणि ट्रिपल एच बाजूला झाल्यानंतर रॉंड आणि स्टेफनी मॅकमहोन दोघी भिडल्या.शेवटी रॉन्डा रौसीने डब्ल्यूडब्ल्यूईचे प्रमुख ब्रँड ऑफ‍िसर स्टेफनीला रिंगच्या बाहेर फेकून दिले.

द रॉकची झुंज ट्रिपल एचच्या पत्नीशी
वास्तविक द रॉक डब्ल्यूडब्ल्यूईच्या रसेलमानियामध्‍ये परतण्‍याची इच्छा आहे. या कारणामुळे तो आपली फास्ट अँड फ्युरियस 7 या चित्रपटामधील सह-कलाकार रॉन्ड रौसीसह मियामीमध्‍ये आयोजित एका कार्यक्रमात सामील झाले. द रॉक हा आपल्या उत्साहात दिसला. येताच त्याने ट्रिपल एचला लक्ष्‍य केले व त्याला अपशब्द वापरले. याने प्रसंगी रागावलेली ट्रिपल एच ची पत्नी स्‍टेफनीने कशाचीही चिंता न करता द रॉकच्या श्रीमुखात दिले.रॉक निघून गेला.

मिळाली रौसीची साथ, द रॉकने केला हल्ला बोल
द रॉक रिंगच्या बाहेर निघाल्यानंतर रॉंडा रौसीची एंट्री झाली. यामुळे तो पुन्हा रिंगमध्‍ये परतला.काही संवाद झाल्यानंतर रौसीला राग आला. तिने ट्रिपल एचवर जोरदार आक्रमण केले.यात त्याला जोरात उचलून खाली आपटवले. नंतर स्टेफनीलाही सोडले नाही. ट्रिपल एच आणि स्टेफनी दोघे रिंगबाहेर पडले आणि निघून गेले.

पुढील स्लाइड्सवर पाहा,कशारितीने दोन दिग्गज पैलवानांना महिलांनी चारीमुंड्या चित केले...