आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट समालोचनातील "सुमधुर आवाज' शांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - क्रिकेटच्या मैदानावरील रोमांचकतेला आपल्या शब्दांमधून आणि ओजस्वी वाणीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा आवाज आता क्रिकेटमधून लुप्त झालाय. समालोचनाच्या जगतातील सर्वोत्तम व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि समालोचक रिची बेनो यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. ८४ वर्षीय बेनो हे बर्‍याच काळापासून कर्करोगाने ग्रस्त होते आणि २०१३ मध्ये त्यांच्या घराजवळच एका कार अपघातात ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांची तब्येत डळमळीतच होती. बेनो हे ऑस्ट्रेलिया संघातील महान अष्टपैलू खेळाडू होते. ऑस्ट्रेलियाकडून ६३ कसोटी सामने खेळतानाच त्यांनी २८ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. यात हजारांपेक्षा अधिक धावा तसेच २०० पेक्षा अधिक बळी मिळवण्याची कामगिरी केली. १९६४ मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तत्पूर्वी, कारकीर्दीत एकही मालिका गमावणारा कर्णधार म्हणून त्यांनी विक्रम रचला होता.

क्रिकेटबेनोंचे अविभाज्य नाते
रिचीबेनो यांनी तारुण्यात क्रिकेटचे मैदान गाजवले, तर नंतर मैदानाबाहेर राहूनही क्रिकेटशी असलेले नाते तुटू दिले नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील आजी-माजी खेळाडूंचे ते आदर्श राहिले आहेत. मागची दोन वर्षे वगळता उर्वरित आयुष्य त्यांनी क्रिकेटसाठी वाहून दिले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि बेनो हे एकमेकांस पूरक असे अविभाज्य घटक झाले होते.

हा खूप दु:खद दिवस
प्रियरिची, मी तुम्हाला ३० वर्षांपासून ओळखत होतो. तुम्ही एक दिग्गज आणि महान खेळाडू होता. तुमच्या निधनाने अतीव वेदना झाल्या आहेत. शेनवॉर्न, माजी फिरकीपटू, ऑस्ट्रेलिया

धैर्य देणाराच गेला
रिचीबेनो माझ्यासाठी आदर्शवत व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी नेहमीच खेळण्यासाठी प्रोत्साहन आणि धैर्य दिले आहे. त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू

आयकॉन गमावला : अ‍ॅबोट
"ऑर्डरऑफ ब्रिटिश एम्पायर' या अत्यंत सन्मानाच्या पुरस्काराने सन्मानित रिची बेनो हे ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे खरे आयकॉन होते. त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कधीच भरून निघणे शक्य नाही, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबोट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सर्वोत्तम समालोचक, सुमधुर आवाज
क्रिकेटमधूननिवृत्ती स्वीकारल्यानंतरही त्यांनी क्रिकेटशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. त्यानंतर त्यांनी जगातील सर्वोत्तम समालोचक आणि ब्रॉडकास्टरच्या रूपात नावलौकिक मिळवला. आधी बीबीसी आणि नंतर ऑस्ट्रेलियाच्या चॅनल नाइनवरील क्रिकेट प्रसारणात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. १९९७ मध्ये कॅरी पॅकर मालिका सुरू करण्यातही त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली.