आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACTS: 'बीसीसीआय' जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर विभागाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) 2300 कोटींचा कर भरण्याचे आदेश दिले आहेत. बीसीसीआय देशातील सर्वोच्च क्रिकेट नियामक मंडळ आहे. तामिळनाडू सोसायटीज अँक्टनुसार स्थापन झालेली बीसीसीआय ही एक संस्था (सोसायटी) आहे. असे असले तरी या संस्थेचे स्वरूप प्रायव्हेट क्लब कंसॉर्टियमप्रमाणे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे सदस्य या नात्याने बीसीसीआयला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू तसेच अंपायर निवडण्याचे अधिकार आहेत. देशाच्या बाहेर अथवा देशामध्ये या मंडळाच्या परवानगीशिवाय कोणत्याही सामन्यांचे आयोजन करता येत नाही.

- 1928 मध्ये बीसीसीआयची स्थापना झाली. तेव्हा यासोबत संलग्नित असलेल्या सदस्यांची संख्या केवळ सात होती. आर.ई. ग्रँट हे या मंडळाचे पहिले अध्यक्ष तर अँथोनी डिमेलो पहिले सेकेट्ररी होते.

- 27 राज्यांतील क्रिकेट असोसिएशन तसेच तीन नॉन प्लेइंग सदस्य या मंडळाचे सभासद आहेत. राज्यस्तरीय संघटनांचे सदस्य होण्यासाठी इतर सदस्यांची शिफारस आवश्यक असते.

- 2006 पर्यंत टॅक्सच्या कचाट्यातून सुटण्यासाठी मंडळ एक धर्मादाय संस्था असल्याचा दावा करत होते. मात्र, 2006 मध्ये इन्कम टॅक्स विभागाने मंडळाला कर माफ न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीसीसीआय आयकरच्या अखत्यारित आले.