आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Things That Only KKR & Delhi Daredevils Knew About Rs 2.4 Cr B'luru Lad

KKR चा रहस्यमयी फिरकीपटू, भावाच्‍या फीससाठी शिक्षण सोडून खेळला क्रिकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल-8 साठी काल (सोमवार) लिलाव झाला. त्‍यामध्‍ये प्रथम श्रेणी किंवा रणजी क्रिकेटमध्‍ये न खेळलेला करियप्‍पा नावाचा फिरकीपटू होता. ज्‍याचे निर्धारीत मूल्‍य 10 लाख रुपये होते. मात्र, कोलकाता नाइट रायडर्सने त्‍याला 2.4 कोटी रुपयांमध्‍ये खरेदी केले.आठ पैकी सहा संघमालकांनी त्‍यांच्‍याकडे पाहिलेसुध्‍दा नव्‍हते.
( फोटो- टीम मेंटर शिंदे सोबत करियप्पा)
क्रिकेटसाठी सोडले शिक्षण
के.सी. करियप्पा सर्वसाधारण मुलाप्रमाणेच आहे. कर्नाटकमधील कुर्ग येथील रहिवासी असलेल्‍या करियप्‍पाचे वडिल बंगळुरुमध्‍ये सुपरवायझर आहेत. त्‍यांचा मासिक पगार 20 हजार रुपये आहे. काही वर्षांपूर्वी करिअप्‍पाच्‍या भावाला फॅशन डिझाईन कोर्ससाठी फीससाठी पैसे आवश्‍यक होते. त्‍यामुळे करिअप्‍पाने आपले शिक्षण सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले.
पाच वर्षांपूर्वी सुरु केले क्रिकेट
करियप्पाने'जावर्स क्रिकेट क्लब'मध्‍ये प्रवेश घेतला. आणि क्रिकेटमध्‍ये आपला जम बसवू लागला. सामान्यत: तो लेग-स्पिन बॉलिंग करतो. मात्र, ऑफ-स्पिन गोलंदाजीसुध्‍दा त्‍याची कमालीची आहे.

केपीएलमधून आला चर्चेत
करियप्पाने कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) मध्‍ये 6 सामन्‍यात 11 विकेट मिळविल्‍या. त्‍याची सरासरी 12 होती तर बेस्‍ट स्‍कोर 19 धावांवर चार विकेट आहे. तो कर्नाटकच्‍या अंडर 19 संघात राखीव खेळाडू म्‍हणून खेळतो.
कॅलिसला बॉलिंग करणे ठरले टर्निंग पॉइंट
करियप्पाने दक्षिण आफ्रिकेच्‍या जॅक कॅलिसला गोलंदाजी केली होती. 15 दिवसीय प्रशिक्षण शिबीरात कॅलिस करिअप्‍पाच्‍या गोलंदाजीवर प्रभावीत झाला होता. कॅलिसने व्‍यवस्‍थापकांना सांगून करिअप्‍पाला संघात स्‍थान देण्‍याचा सल्‍ला दिला होता. तेव्‍हापासून करियप्पा संघाचे मेंटर शिंदे आणि व्हिडिओ अॅनालिस्ट ए.आर. श्रीकांतच्‍या संपर्कात होता.
2.4 कोटी रुपयात खरेदी करण्‍याचे कारण
लिलावापूर्वी करिअप्‍पाला दिल्‍ली डेअरडेविल्‍स खरेदी करणार अशी जोरदार चर्चा होती. त्‍यामुळे केकेआरने अधिक बोली लावत करिअप्‍पाला खरेदी केले. उल्‍लेखनिय म्‍हणजे केपीएलमध्‍ये कोलकाताच्‍या स्‍टार खेळाडू मनीष पांडेला करिअप्‍पाने बाद केले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा,कोणत्‍या खेळाडूवर किती लागली बोली...