आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third One Day Match: Today Indian Team Situation Like Do Or Die

तिसरा एकदिवसीय सामना: भारतीय संघासाठी ‘करा वा मरा’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - सलग दोन सामन्यांतील लाजिरवाण्या पराभवाने अडचणीत सापडलेल्या भारतीय संघासाठी शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध होणारा तिसरा वनडे ‘करा वा मरा’ असा आहे. दोन सामने जिंकून यजमान टीमने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता न्यूझीलंडचा विजयी रथ रोखण्याचे टीम इंडियासमोर तगडे आव्हान आहे. या सामन्यातील पराभवासह भारताला मालिकाही गमावावी लागेल. तिस-या वनडेच्या पूर्वसंध्येलाच विराट कोहलीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचे या सामन्यात खेळणे अनिश्चित आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिका दौ-यात भारताला मालिकेत पराभव पत्करावा लागला होता.
धोनी अँड कंपनीला विदेश दौ-यात आतापर्यंत पाचपैकी चार वनडेत पराभवाला सामोरे जावे लागले. यातून विदेशी खेळपट्टीवरची भारतीय गोलंदाजांची दुबळी बाजू जगजाहीर झाली आहे. ऑफ स्पिनर आर. अश्विन सलग दोन सामन्यांत सपशेल अपयशी ठरला आहे. त्याला यात एकही विकेट घेता आली नाही. मात्र, चेंडू उसळणा-या खेळपट्टीवर मो. शमी वगळता एकही गोलंदाज यशस्वी ठरला नाही. भारतीय गोलंदाज आर.अश्विन आणि ईशांत शर्माचा फ्लॉप शो झाला.
भुवनला विजयाची आशा
भारतीय संघ तिस-या वनडेत विजय मिळवून यजमानांचे हॅटट्रिक नोंदवण्याचे मनसुबे उधळून लावेल, अशी आशा भुवनेश्वर कुमारला आहे. सध्या टीमवर कोणत्याही प्रकाराचा दबाव नाही. त्यामुळे टीम इंडिया सहज विजय मिळवेल,असेही तो म्हणाला.
शिखर धवन, रोहित शर्माकडून निराशा
सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने सपशेल निराशा केली. या दोघांनाही टीम इंडियाला अद्याप चांगली सुरुवात करून देता आली नाही. आतापर्यंत या जोडीने 22 धावांची भागीदारी केली आहे. गतवर्षी 22 सामन्यांत 1247 धावांची भागीदारी करणारी ही जोडी विदेशी खेळपट्टीवर अपयशी ठरली.
संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, ईशांत शर्मा, मो. शमी, ईश्वर पांडे, भुवनेश्वर.
न्यूझीलंड : ब्रेंडन मॅक्लुम, गुप्तिल, जेसी रायडर, केन विलियसन, रॉस टेलर, कोरी अँडरसन, जेम्स निशाम, ल्युक रोंची, नॅथन मॅक्लुम, हामिश बेनेट, केली मिल्स, टीम साऊथी, मॅक्लिनघन.