आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third Test : Newzealand's Fultan Cross The Century

तिसरी कसोटी : न्यूझीलंडच्या फुल्टनचे शतक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑकलंड - इंग्लंडविरुद्ध तिस-या कसोटीच्या दुस-या डावात सलामीवीर पीटर फुल्टनने शानदार 110 धावा काढल्या. त्याने पहिल्या डावातही 136 धावा काढल्या होत्या. फुल्टनशिवाय केन विल्यमसनच्या (2/5) गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने चौथ्या दिवसअखेर इंग्लंडला अडचणीत आणले. न्यूझीलंडने सहा बाद 241 धावांवर आपला डाव घोषित करून इंग्लंडसमोर 481 धावांचे अवघड लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 बाद 90 धावा काढल्या. इंग्लंडला विजयासाठी अजून 391 धावांची गरज असून, त्यांच्या हाती 6 विकेट शिल्लक आहे.


संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड पहिला डाव-443. दुसरा डाव 6 बाद 241 धावा. इंग्लंड पहिला डाव-204, दुसरा डाव 4 बाद 90 धावा (कुक 43, ट्रॉट 37, 1/24 साऊथी, 2/5 विल्यमसन).