आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहाली - टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपल्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने तीन बाद 75 धावा केल्या होत्या. या तिन्ही विकेट भुवनेश्वर कुमारने टिपल्या.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज फिलीप ह्युजने आक्रमक फलंदाजी करताना नाबाद 68 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 9 चौकार आणि एक षटकार मारले. स्टिवन स्मिथ बाद झाल्यानंतर ऑसीजने नाईट वॉचमन नॅथन लियोनला फलंदाजीस पाठवले. तो 4 धावांवर खेळत आहे.
उद्या (सोमवार) कसोटीचा शेवटचा दिवस आहे. ऑस्ट्रेलिया अद्यापही 16 धावांनी पिछाडीवर असून त्यांच्याकडे 7 विकेट शिल्लक आहेत. सकाळच्या सत्रात टीम इंडियाने जर लवकर गडी बाद केले तर तिसरी कसोटीही पदरात पाडून घेण्याची नामी संधी टीम इंडियाला लाभली आहे. त्यामुळे सकाळचे सत्र खूपच महत्वाचे आहे.
तत्पूर्वी, वॉर्नर बाद झाल्यानंतर कोवानही लवकर बाद झाला. कुमारने त्याला आठ धावांवर पायचित केले. दुस-या डावात 91 धावांनी पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्याच षटकात धक्का बसला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा स्विंग चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक कर्णधार धोनीच्या हाती जाऊन विसावला. वॉर्नरला अवघ्या 2 धावा करता आल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.