आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Indian Team Different Rather Than 2011 Machial Wan

हा भारतीय संघ 2011 पेक्षा चांगला - मायकेल वॉन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - दोन वर्षांपूर्वी अर्थात 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकणा-या टीम इंडियापेक्षा यंदाचा भारतीय संघ अधिक लढवय्या आणि चांगला असल्याचे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने व्यक्त केले आहे. ‘सध्याचा भारतीय संघ अत्यंत जबरदस्त आहे. या संघाला कशाचीही भीती नाही आणि अत्यंत आक्रमकपणे टीम इंडिया खेळत आहे. यापूर्वी भारतीय संघाला मी अशा रूपात कधीही पाहिले नाही. स्पष्ट बोलायचे झाल्यास 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकणा-या संघापेक्षाही हा संघ अधिक उत्तम आहे,’ असे वॉनर्न ‘डेली टेलिग्राफ’ मधील आपल्या लेखात म्हटले.

भारतीय संघात युवा खेळाडू स्वच्छंदी खेळ करतात. जडेजा, रैना, कोहलीसारख्या युवा खेळाडूंमुळे भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावला आहे. मोठ्या खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यामुळे आता युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करीत आहेत, असेही वॉन म्हणाला.