आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: रोहित शर्माचे नवे घर आतून असे दिसते, किंमत 30 कोटी रूपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काहीसा असा असेल रोहितच्या फ्लॅटचा लिविंग एरिया. इन्सेटमध्ये पत्नी रितिकासमवेत रोहित... - Divya Marathi
काहीसा असा असेल रोहितच्या फ्लॅटचा लिविंग एरिया. इन्सेटमध्ये पत्नी रितिकासमवेत रोहित...
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माने रविवारी आपला 29th बर्थडे साजरा केला. रोहित शर्माने त्याच दिवशी मुंबईत झालेल्या मॅचमध्ये नाबाद अर्धशतक ठोकत विराट सेनेचा धुव्वा उडविला. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्याच्या नव्या घराबाबत सांगणार आहोत जे 30 कोटी रूपयाचे आहे. या नव्या लग्जरियस फ्लॅटमध्ये तो लवकरच शिफ्ट होणार आहे. त्याने मुंबईतील वरळी येथे 2015 मध्ये हा फ्लॅट खरेदी केला होता. वरळीतील आहूजा टॉवर्समधील 29 व्या फ्लोअरवर त्याचा हा 4BHK फ्लॅट आहे. आहूजा टॉवर्सच्या ऑफिशियल्सने आम्हाला सांगितले की, रोहितच्या या फ्लॅटमध्ये इंटीरियरचे काम सुरु आहे, आणि त्याला फायनल टच दिला जात आहे. या गणेशोत्सवात रोहित या फ्लॅटमध्ये राहायला जाण्याची शक्यता आहे. रोहित सध्या पत्नी रितिकासमवेत बोरीवलत राहतो. असा आहे लग्जरी फ्लॅट...
 
- हा 4-बीएचके फ्लॅट सुमारे 5700 स्क्वेयर फूटचा आहे, ज्यात लिविंग रूमचा एरिया सुमारे 750 स्क्वेयर फूट आहे.
- बाल्कनीच्या वॉलसाठी ग्लासचा वापर केला आहे. ज्यात 270 डिग्री व्यू मिळतो. बाल्कनीतून बांद्रा-वरळी सी लिंकचा नजारा दिसतो.
- मास्टर बेडरूम 590 स्क्वेयर फूटचा आहे. बेडरूममधून सुद्धा सिटीचा नजारा दिसतो. याला इम्पोर्टेड मार्बलचा वापर केला आहे.
- फ्लॅटमध्ये मलेशियन कॉन्सेप्टवर बेस्ट किचन आहे, म्हणजेच वेट किचन आणि ड्राय किचन असे दोन सेक्शन आहेत.
- डायनिंग एरिया किचनजवळच आहे, मात्र त्याला लिविंग रूमपासून दूर ठेवले आहे. बाथरूममध्ये जकूजीची फॅसिलिटी सुद्धा आहे.
- फ्लॅटमध्ये हाउस-पार्टीसाठी भरपूर स्पेस ठेवला गेला आहे. 
- फ्लॅटमध्ये मिनी एंटरटेनमेंट एरिया आहे. याशिवाय टावरमध्ये हाय-प्रोफाईल लोकांना लक्षात ठेऊन बिजनेस एरिया सुद्धा बनवला गेला आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोहित शर्माचे Luxurious Flat चे Inside Photos...
 
फोटो सोर्स : आहूजा टावर्सची ऑफिशियल वेबसाईट
बातम्या आणखी आहेत...