Home | Sports | From The Field | this is the best innings by sachin tendulkar

ही आहे सचिन तेंडूलकरची सर्वोत्‍कृष्‍ट खेळी, पाहा व्हिडिओ...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 23, 2011, 01:22 PM IST

त्‍याने एकदिवसीय सामन्‍यात 48 आणि कसोटी सामन्‍यांमध्‍ये 51 शतके लगावली आहे. पण तुम्‍हाला मा‍हीत आहे का सचिन तेंडूलकरच्‍या मते त्‍याची सर्वोत्‍कृष्‍ट खेळी कोणती आहे?

  • this is the best innings by sachin tendulkar

    नवी दिल्‍ली- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडूलकर आपल्‍या शतकांच्‍या महाशतकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. त्‍याने एकदिवसीय सामन्‍यात 48 आणि कसोटी सामन्‍यांमध्‍ये 51 शतके लगावली आहेत. पण तुम्‍हाला मा‍हीत आहे का सचिन तेंडूलकरच्‍या मते त्‍याची सर्वोत्‍कृष्‍ट खेळी कोणती आहे? नाही ना. सचिन तेंडूलकरने एका मुलाखतीत 2003 च्‍या विश्‍वचषकातील पाकिस्‍तानविरूद्धच्‍या खेळीला सर्वोत्‍कृष्‍ट खेळी असल्‍याचे सांगितले आहे.
    सचिन तेंडूलकरच्‍या मते, त्‍या सामन्‍यात वसीम अक्रमसह अनेक चांगले गोलंदाज पाकिस्‍तानकडे होते आणि त्‍याच्‍या या खेळीमुळे भारताला सामना जिंकता आला होता. या सामन्‍यात सचिनचे शतक केवळ दोन धावांनी हुकले. तो 98 धावांवर धावबाद झाला होता. त्‍याशिवाय त्‍याने एकदिवसीय सामन्‍यांमधील 12 हजार धावाही याच सामन्‍यात पूर्ण केले होत्‍या.
    पाकिस्‍तानने पहिल्‍यांदा फलंदाजी करताना सात गडयांच्‍या बदल्‍यात 273 धावा केल्‍या. या सामन्‍यात भारत विजयी ठरला. तुम्‍हीही या व्हिडिओमध्‍ये पाहा सचिन तेंडूलकरची अविस्‍मरणीय खेळी.

Trending