आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्बाडोसमध्ये येत्या नोव्हेंबरपासून टी-20 चे आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - येत्या 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान बार्बाडोस (वेस्ट इंडीज) मध्ये एका टी-20 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पाकिस्तान, भारत, वेस्ट इंडीज आणि इंग्लंडचे संघ सहभागी होतील. ‘ट्वेंटी-20 वर्ल्ड मास्टर्स ऑफ क्रिकेट टुर्नामेंट’ असे या स्पध्रेचे नाव आहे.

एका स्थानिक आयोजकाने दिलेल्या माहितीनुसार स्पध्रेचे नियम रंजक आहेत. या स्पध्रेत खेळणार्‍या सर्व खेळाडूंचे वय 35 पेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. याशिवाय तो खेळाडू आपल्या देशाकडून वनडे किंवा कसोटीपैकी एका स्वरूपात तरी प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे.

इतर संघांचे संभाव्य खेळाडू
पाकिस्तान : इंझमाम-उल-हक, शोएब अख्तर, मोहंमद युसूफ, सकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद, असीम कमाल, यासर अहमद, राणा नावेद हसन, रशीद लतीफ, शब्बीर अहमद, असीम कमाल, यासीर हमीद, अर्शद खान, सईद अन्वर, वकार युनूस आणि अझहर मेहमूद.

वेस्ट इंडीज : ब्रायन लारा, कार्ल हुपर, कर्टनी वॉल्श, कर्टली अँम्ब्रोस, गॉर्डन ग्रिनिज, डेसमंड हेन्स, लॉयड रेफियर, वेस्बर्ट ड्रेक्स, कर्टनी ब्राऊने, कॉलिस किंग, एजरा मोस्ली, स्टुअर्ट विल्यम्स, पेड्रो कॉलिन्स.

इंग्लंड : पॉल कॉलिंगवूड, ग्रॅहमी हिक, पॉल निक्सन, ग्लॅडस्टोन स्मॉल, नील फेयरब्रदर, फिलड डेफ्रिटिस, डेवेन माल्कम, डीन हॅडली, जॉन एम्बुरी, ग्लेन चॅपल, मॅथ्यू मेनार्ड, क्रिस स्कोफिल्ड.


माझा फिटनेसवर जोर
भारतीय मास्टर्स संघात निवड झाल्याने आनंदी आहे. माझा फिटनेसवर जोर असतो. या स्पध्रेसाठी आणखी सराव करून चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करेन. इक्बाल सिद्दिकी, माजी भारतीय क्रिकेटपटू

भारतीय संघ
राहुल द्रविड, रॉबिनसिंग, राहुल संघवी, अमेय खुरासिया, प्रवीण आमरे, नरेंद्र हिरवाणी, हरविंदरसिंग, विजय दाहिया, इक्बाल सिद्दिकी, अँबी कुरुविला, गगन खोडा, सदागोपन रमेश.