आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्टने रिटायरमेंटची मित्रांना दिली अशी पार्टी, फक्त दारूचे बिल आले 6 लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका पार्टीदरम्यान उसैन बोल्ट... - Divya Marathi
एका पार्टीदरम्यान उसैन बोल्ट...
स्पोर्ट्स डेस्क- जगातील सर्वात वेगवान धावपट्टू हुसैन बोल्टने अनेक विश्वविक्रम बनवत रेसिंग ट्रॅकला अलविदा म्हटले आहे. आता त्याने ऑफ द ट्रॅक सुद्धा एक धक्कादायक रिकॉर्ड बनवला आहे. तो रिकॉर्ड म्हणजे रिटायरमेंटनंतर बोल्टने लंडनच्या एका बारमध्ये जोरदार दारू प्याली. बोल्टने आपल्या मित्रांसमवेत त्या रात्री केलेल्या पार्टीत तब्बल 6 लाख रुपयांची (6,530 पाउंड) दारू ढोसली. सोशल मीडियात बारमधील बिलाचे फोटो व्हायरल होत आहेत. ही दारू घेतली बोल्टने...
 
- आपल्या रिटायरमेंट रेसमध्ये चांगली कामगिरी करू न शकणा-या बोल्टने दोस्तांसमवेत अनेक प्रकारची दारू ढोसली. यात Dom Pérignon विंटेजची 3 बॉटल, Magnum Ciroc ची1 बॉटल, Dom Pérignon व्हीटीजीच्या 2 बॉटल, अनेक व्होडका शॉट्ससोबतच 23 रेड बुल, 18 कोक सह आणखी विविध प्रकारची घेतली. 
 
जिंकून शकला नाही शेवटची रेस-
 
11 वर्ल्ड आणि 8 वेळा ऑलिंपिक गोल्ड मेडल विजेता बोल्ट जमेकाच्या 4X100 मीटर रेसमध्ये आपल्या टीमसमवेत शेवटच्या लॅप रेससाठी तयार होते. जमेकाच्या तीन रेसर्सने आपले काम 300 मीटरपर्यंत पूर्ण केले होते. मात्र, अंतिम टप्प्यात बोल्ट जखमी होऊन मैदानात पडला आणि रेस पूर्ण करू शकला नाही. या रेसमध्ये गोल्ड मेडल ब्रिटनच्या नावावर राहिले. सिल्वर मेडल अमेरिका आणि ब्राँझ जपानने जिंकले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, उसेन बोल्टचे सोशल मीडिया फोटोज...
बातम्या आणखी आहेत...