आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वेळी डेव्हिस चषकात खेळणार राफेल नदाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - राफेल नदाल जागतिक क्रमवारीत नंबर वन बनण्याच्या जवळ आहे. मात्र, तो डेव्हिस चषक टेनिस स्पध्रेत स्पेनचे प्रतिनिधित्व करणार आहे. सलग टेनिस खेळून मी निश्चितपणे थकलो आहे. मात्र, देशासाठी खेळणे नेहमीच अभिमानाची बाब असते, असे नदालने म्हटले. डेव्हिस चषकाच्या सामन्यानंतर तो आशियाई सर्किटमध्ये व्यावसायिक टेनिस खेळण्यास जाईल.


नदालला डेव्हिस चषकाच्या सामन्यात युक्रेनविरुद्ध खेळायचे आहे. 2011 नंतर नदाल प्रथमच डेव्हिस चषकाचे सामने खेळेल. ‘मी खूप थकलो आहे. विर्शांती घेऊन आशिया दौर्‍यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची माझी इच्छा आहे. हे वर्षातील अखेरचे दिवस आहेत आणि मी नंबर वन बनण्याच्या उंबरठय़ावर आहे,’ असे 13 ग्रँडस्लॅम विजेता नदालने म्हटले. नदाल जून 2011 मध्ये अव्वलस्थानी होता.