Home »Sports »Other Sports» This Year No Chhatrapati Sports Award

‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ यंदाही हुकणार

धनंजय रिसोडकर | Jan 24, 2013, 06:05 AM IST

  • ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ यंदाही हुकणार

नाशिक- आंतरराष्‍ट्री य पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणा -या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शकांना शिवछत्रपती पुरस्कार देण्याबाबतच्या नियमावलीत बदल करण्यात आला. या कारणास्तव गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार यंदादेखील हुकणार आहेत. यामुळे प्रतीक्षेत असलेल्या पुरस्कारार्थींचा सलग तिस -या वर्षी हिरमोड होणार आहे. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या वल्गना करणा-या शासनाकडून राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारांबाबत होत असलेली हेळसांड अक्षम्य असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या नव्या नियमावलीतील बदलासाठी दोन वर्षांपूर्वी क्रीडा आणि युवक सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. 2011 मध्ये नवीन नियमांचा अंतर्भाव करून या समितीने अहवाल क्रीडा विभागास सादर केला. मात्र, या अहवालावर कार्यवाही करण्यासाठी आणि त्याबाबाबतचा शासननिर्णय जाहीर करण्यासाठी क्रीडा विभागाने 2012 मधील ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या काळाचा अपव्यय केला. 1 ऑक्टोबर 2012 मध्ये शासननिर्णय जाहीर झाल्यानंतरही तरी राज्याच्या क्रीडा विभागाने अद्यापही वेळकाढूपणाचे धोरण कायम ठेवले. गतवर्षीच क्रीडामंत्र्यांनी 2013 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार निर्धारित तारखांनाच दिले जाणार असल्याची केलेली घोषणादेखील हवेतच विरल्यात जमा आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यासाठी राज्य शासनाने स्वत:च त्यांची मुदत 15 डिसेंबर तर पुरस्कार प्रदान करण्याची तारीख 19 फेबु्रवारी (शासकीय शिवजयंती ) जाहीर केलेली आहे. मात्र, 15 डिसेंबरनंतर तब्बल सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेल्यावरही राज्याच्या क्रीडा विभागाला या पुरस्कारांच्या घोषणांचे स्मरणदेखील झालेले नाही .
हा तर शिवरायांच्या नावाचाही अवमान
खेळासाठी आयुष्य घालवलेल्या व्यक्तीला जर तीन-तीन वर्षे वाट पाहावी लागणार असेल, तर त्याला त्या पुरस्काराबाबत काय उत्साह राहील? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार द्यायचा आणि त्याची शिस्तदेखील पाळली जात नसेल, तर तो त्या शिवरायांच्या नावाचाही अवमान आहे. ज्या खेळाडूने, राज्याचे नाव देशात गाजवले. त्याला पुरस्कार म्हणजे उपकार केल्याची भावना असेल तर राज्यातील खेळाचा विकास होणेच शक्य नाही, अशी भावना क्रीडातज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी व्यक्त केली.

Next Article

Recommended