आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक वर्चस्वाच्या संघर्षाची मेजवानी दिल्लीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विश्व बॅडमिंटन वर्चस्वाची मोहोर उठवणारी थॉमस आणि उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 18 ते 25 मे या कालावधीत नवी दिल्लीत होत आहे. विश्व बॅडमिंटनमधील पुरुषांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी थॉमस कप स्पर्धा व महिलांमधील सर्वोत्तम संघावर शिक्कामोर्तब करणारी उबेर कप स्पर्धा यांच्या प्राथमिक फेर्‍यांचे आयोजन भारताने याआधी 1988, 2000 व 2006 या वर्षी केले होते.

त्यामुळेच जगातील सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाची मेजवानी देणारा अंतिम सामना यंदा प्रथमच भारताला बहाल करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील सिरी फोर्ट स्पोर्ट््स कॉम्प्लेक्स येते ही अंतिम लढत रंगेल.

यासाठी विश्व बॅडमिंटनमधील एकूण 16 संघच पात्र असतील. त्यापैकी 14 संघ जागतिक क्रमवारीतील असतील. गतविजेता आणि यजमान अशा एकूण टॉप 16 संघांमध्ये अंतिम लढतीचा संघर्ष पाहायला मिळेल. यजमान या नात्याने भारताच्या पुरुषांना थॉमस कप स्पर्धेत तर महिलांना उबेर कप अंतिम लढतीत स्थान मिळाले आहे. पुरुषांमध्ये 16 मध्ये भारताला 9 वे मानांकन आहे.
थॉमस कप स्पर्धेच्या गतविजेत्या चीनला दुसरे मानांकन असून पहिल्या स्थानावर इंडोनेशिया आहे. महिलांमध्ये उबेर कपच्या अंतिम लढतीसाठीच्या मानांकनात गजविजेते चीन यांनाच अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. बॅडमिंटनमधील पुरुषांच्या सांघिक वर्चस्वाची सर जॉर्ज थॉमस या माजी महान बॅडमिंटनपटूंच्या नावाने ट्रॉफी दिली जाते. थॉमस यांनी 21 वेळा ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याचा उच्चांक केला होता. उबेर कप हा महिलांच्या सांघिक वर्चस्वासाठीचा कप बेट्टी उबेर या महान महिला खेळाडूच्या नावाने देण्यात येतो. पात्र संघ : अंतिम लढतीसाठी पात्र ठरलेल्या संघात 3 आशियाई संघ, 3 युरोपियन संघ, पॅन अमेरिकन गटातील अव्वल संघ व आफ्रिका व ओसेनियामधील संघ असतील.

22 मेपासून बाद फेरी
बाद फेरीला 22 मेपासून सुरुवात होईल. उपांत्य लढती 23 मे रोजी, तर उबेर कपची अंतिम लढत 24 मे रोजी व थॉमस कप कोण जिंकणार याचा निर्णय 25 मे रोजी लागेल. बाद फेरीचे सामने दुपारी 12 नंतर सुरू होतील. अंतिम सामने 3 नंतर सुरू होतील.