आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्गज अडचणीत: युवी, झहीर, सेहवाग, गंभीर, हरभजनचे पुनरागमन अवघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीअाय) निवड समितीने सोमवारी ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. अत्यंत कठीण मानल्या जाणा-या या दौ-यासाठी निवड समितीने अनुभवी खेळाडू युवराजसिंग, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, हरभजनसिंग आणि वेगवान गोलंदाज जहीर खान यांच्याकडे दुर्लक्ष केले. या पाचपैकी एकाचीही निवड होऊ शकली नाही. गेले कित्येक दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी होती. मात्र, आता या खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय सामन्यांतील पुनरागमन कठीण दिसत आहे. यामुळे या खेळाडूंची निवृत्तीची वेळ जवळ आली असल्याचेही बोलले जात आहे.

कसोटी संघात स्थान नाही
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर गंभीर, सेहवाग, युवराज, जहीर या अनुभवी खेळाडूंवर भारतीय कसोटी संघाची मदार होती. मात्र, सुमार फॉर्मामुळे सेहवाग, गंभीर संघाबाहेर झाले. जहीरला फॉर्मपेक्षा फिटनेसने अधिक त्रस्त केले. हरभजनची जागा अश्विनने घेतली. युवीला मधल्या फळीत रहाणे, रोहित, कोहलीच्या रूपाने पर्याय मिळाल्याने पाच खेळाडूंचे आता कसोटी संघात पुनरागमन कठीण असल्याचे दिसते. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना मदतगार असतात. या खेळपट्ट्यांवर जहीर हुकुमी एक्का ठरू शकला असता. मात्र, निवड समितीने त्याच्याऐवजी उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, वरुण अॅरोन या युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला.

वनडे संघातही स्थान नाही
टीम इंडियाच्या २०११ च्या वर्ल्डकप विजयात युवराज, जहीर खान, सेहवाग, गंभीर आणि हरभजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता अवघ्या चार महिन्यांवर पुढचा वर्ल्डकप आला या पाच दिग्गजांना वनडे संघातही स्थान नाही. गेले कित्येक महिने हे पाच दिग्गज वनडे संघाबाहेर आहेत. यामुळे आगामी वर्ल्डकपमध्ये कर्णधार धोनी आणि निवड समिती या दिग्गजांचा विचार करेल, असे वाटत नाही.

चाैथ्या वनडेसाठी टीम कोलकात्यात
काेलकाता । श्रीलंंकेविरुद्ध मालिका विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे मंगळवारी काेलकाता येथे अागमन झाले. अाता गुरुवारी मालिकेतील चाैथ्या सामन्यात इडन गार्डनवर भारत अाणि श्रीलंका समाेरासमाेर असतील. यजमान टीम इंिडयासाठी अाता उर्वरित दाेन्ही सामने हे केवळ अाैपचारिक ठरले अाहे. भारताने सलग विजयांसह मालिका ३-० ने अापल्या नावावर केली.
पुढे वाचा, या पाचही दिग्गजांच्या योगदानाबाबत...