आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन कर्णधारांना ‘चेन्नई’चा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - श्रीलंकेत सध्या तामिळविरोधी वाद सुरू आहे. या वादाचे पडसाद तामिळनाडूमध्ये उमटले. या वादंगामुळे तामिळनाडू राज्य सरकारने श्रीलंकेच्या खेळाडूंना चेन्नईत होणा-या आयपीएल सामन्यात खेळण्यास विरोध केला. या विरोधामुळे महेला जयवर्धने (दिल्ली), कुमार संगकारा (हैदराबाद) व मॅथ्यूज (पुणे) हे तीन कर्णधार चेन्नईत होणा-या आयपीएल सामन्यांना मुकणार आहेत.


आयपीएल आयोजन समितीने चेन्नईत होणा-या सामन्यात श्रीलंकन खेळाडू व सामना अधिका-यांना बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या चेन्नई सुपरकिंग्ज टीमने संघातील अकिला धनंजय व नुवान कुलशेखरा यांना बाहेर करण्याचे जाहीर केले आहे.


जयवर्धनेची उणीव भासणार महेला जयवर्धनेची चेन्नई सामन्यात अनुपस्थिती दिल्लीसाठी परिणामकारक ठरू शकते. संघात त्यांच्यासह सेहवाग दुसरा अनुभवी फलंदाज आहे.
या तीन कर्णधारांशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिग्गज ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, मुंबई इंडियन्सचा खतरनाक वेगवान गोलंदाज मलिंगाची उणीव भासणार आहे. हे सर्व खेळाडू चेन्नईत खेळू शकणार नाहीत.


टॉम मुडी नाराज
श्रीलंकन खेळाडूंबाबत आयपीएल आयोजन समितीने घेतलेल्या निर्णयावर सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य कोच नाराज आहेत. संघामध्ये संगकारा आणि तिषारा परेरा हे दोन अव्वल खेळाडू आहेत,असे ते म्हणाले.