आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Kiwi Cricketers Investigation Over The Fixing

तीन किवी क्रिकेटपटूंची फिक्सिंगप्रकरणी चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन - न्यूझीलंडचे तीन क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगच्या भोव-यात अडकले असल्याच्या संशयाने त्यांच्याविरुद्ध चौकशीला प्रारंभ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यात न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस केर्न्स याचाही समावेश आहे.
न्यूझीलंड हेरॉल्ड या दैनिकाने म्हटल्यानुसार सध्या न्यूझीलंड - विंडीज मालिकेचे समालोचन स्काय टीव्हीवर करणारा माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्स, डॅरेल टफी आणि लू विन्सेंट या तिघांची इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या वतीने चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणात आयसीसी किंवा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने कुणाचीही नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. मात्र, स्काय टीव्हीने केर्न्सचे नाव या प्रकरणात आले असल्यास तो यापुढे समालोचन करणार नसल्याचे म्हटले आहे.
धक्कादायक तसेच चकित करणारे प्रकरण
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डेव्हिड व्हाइट यांनी हे सर्व प्रकरण प्रचंड धक्कादायक आणि चकित करणारे असल्याचे म्हटले आहे. मात्र, या प्रकरणात न्यूझीलंडच्या कोणत्याही विद्यमान क्रिकेटपटूचे नाव तसेच या देशातील क्रिकेट सामन्यातील फिक्सिंग प्रकरणाचा संबंध नसल्याचे नमूद केले. दरम्यान लू विन्सेंट याने याप्रकरणी मी चौकशी करणा-यांना पूर्ण सहकार्य करीत असून प्रकरणातील तथ्य बाहेर येईपर्यंत तरी सर्वांनी संयम राखावा तसेच ज्या वेळी मला जनतेशी संवाद साधण्याची परवानगी दिली जाईल तेव्हा मी याबाबत बोलणार. सत्य अधिक काळ लपून राहू शकत नाही, असे त्याने नमूद केले.
न्यूझीलंडमधील सर्वात मोठा क्रीडा घोटाळा
दैनिकाने त्याच्या वृत्तात म्हटल्याप्रमाणे जर ही चौकशी पूर्ण होऊन तथ्य बाहेर आले तर तो न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात मोठा क्रीडा घोटाळा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. आयसीसीच्या चौकशी समितीचे सदस्य गत चार महिन्यांपासून न्यूझीलंडमध्ये तळ ठोकून सखोल चौकशी करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.