आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Three Kiwi Players At Centre Of Fixing Investigation\'

न्यूझीलंडच्या तीन क्रिकेटपटूंची मॅच फिक्सिंग प्रकरणी चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन - न्यूझिलंडच्या तीन माजी क्रिकेटपटूंची मॅच फिक्सिंगप्रकरणी चौकशी केली जात आहे. आयसीसीने गुरुवारी सकाळी याबाबत खुलासा केला आहे. किवी खेळाडू ख्रिस केर्न्स, वेगवान गोलंदाज डॅरेल टफी आणि
फलंदाज लू व्हिन्सेंट यांची चौकशी सुरु आहे. लू व्हिन्सेंट याने चौकशी सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्याने तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे.
वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचे भूत क्रिकेटच्या मानगुटीवर बसले आहे. आयसीसी गेल्या कित्येक महिन्यापासून या खेळाडूंची चौकशी करीत आहे. मात्र याबाबतचा खुलासा आज झाला आहे. आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे, की तीन खेळाडूंची चौकशी सुरु आहे मात्र अद्याप त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेले नाही.

पुढील स्लाइडमध्ये, कोण आहेत हे खेळाडू...