आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन रशियन ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंवर बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : सर्जेई किरद्यापकीन
मॉस्को - ऑलिम्पिकमधील चालण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेले तीन रशियन अॅथलिटसह पाच खेळाडूंवर उत्तेजक सेवनप्रकरणी रशियाच्या उत्तेजकरोधक समितीने बंदी घातली आहे. तीन वर्षे आणि दोन महिने एवढ्या काळासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात आली असून २०१२ मधील चाचणीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते सर्जेई किरद्यापकीन आणि ओल्गा कनिस्कीना तसेच २०११ चा जगज्जेता सर्जेई बाकुलीन याचादेखील समावेश आहे. तर व्हॅलेरी बोरचीन या २००८ च्या ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू दुस-यांदा उत्तेजक प्रकरणात दोषी आढळल्याने त्याच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे, तर व्लादीमीर कनायकीन हा वारंवार दोषी आढळल्याने त्याच्यावर आजीवन बंदी लादण्यात आली आहे.

या बंदी प्रकरणामुळे कनिस्कीनाच्या आणि बोरचीनच्या २००९ आणि २०११ मधील २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतील पदके तसेच किरद्यापकीनच्या २००९ सालातील ५० किलोमीटर चालीतील पदके काढून घेतली जाणार आहेत. किरद्यापकीनचेही पदक जाईल.