आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-ऑस्ट्रेलिया आज झुंज ! थेट प्रक्षेपण सकाळी ८.५० वाजता स्टार स्पोर्टस १ व ३ वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- मागच्या दोन विश्वचषकांचे चॅम्पियन टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया रविवारी तिरंगी मालिकेत समोरासमोर असतील. वर्ल्डकपपूर्वी दोन्ही संघांसाठी ही अखेरची वनडे मालिका आहे. याचाच अर्थ दोन्ही संघांना आपली तयारी तपासण्याची ही अखेरची संधी असेल. विश्वचषकातील कोणता संघ किती तुल्यबळ आहे हे या तिरंगी मालिकेतून कळू शकेल. मालिकेतील पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर शानदार विजय मिळवला. आता मालिकेत विजयी प्रारंभ करण्याचा दबाव भारतावरसुद्धा असेल.

टीम इंडियासमोर अडचणी
टीम इंडियासाठी कर्णधार धोनी आपल्या भूमिकेत परतला आहे. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा त्याचे आवडते स्वरूप आहे. असे असले तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम अकरा खेळाडू निवडण्यासाठी त्याला चांगलेच परिश्रम घ्यावे लागतील, असे दिसते. भारताचा स्ट्राइक गोलंदाज कोण असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. नव्या चेंडूने भुवनेश्वरचा जोडीदार कोण
असेल, हे निश्चित करावे लागेल. दुसरे म्हणजे भारताच्या सलामी जोडीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. धवन आणि रोहित सध्या चांगल्या फॉर्मात नाहीत.

ऑस्ट्रेलिया संघ आहे मजबूत
डेव्हिड वॉर्नरमुळे पहिल्या सामन्यात विजय मिळाल्याने ऑस्ट्रेलियन संघ आनंदात आहे. वॉर्नरशिवाय उर्वरित फलंदाज इंग्लंडविरुद्ध संघर्ष करताना दिसले ही भारतासाठी समाधानाची बाब ठरू शकते. असे असले तरीही घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ ऑस्ट्रेलियाला मिळू शकतो. त्यांची फलंदाजीची फळी मोठी आणि भक्कम आहे. शिवाय त्यांची गोलंदाजी
दणकट आहे.

दोन्ही संघ असे असतील
ऑस्ट्रेलिया : जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, ब्रेड हॅडिन, जेम्स फ्युकनर, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्ती, गुरविंदर संधू, केन रिचर्डसन.

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, आर. अश्विन, अक्षर पटेल, मो. शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.
कसोटी निवृत्तीवर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे मौन कायम
अचानकपणे घेतलेल्या कसोटी निवृत्तीबाबत वेगवेगळ्या प्रकारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर धोनीने कोणतीही प्रतिक्रिया न देता मौनच कायम ठेवले आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाइतकेच मला सांगायचे असून त्याउपर अधिक काहीही मी बोलणार नसल्याचे त्याने सांगितले.

तुम्ही वाटेल तसे आणि तितके प्रश्न विचारू शकता. मात्र, निवृत्तीबाबतच्या कोणत्याही प्रश्नावर मी अधिक काहीही बोलणार नसून त्याऐवजी येत्या तिरंगी मालिकेवरच लक्ष केंद्रित करणार आहे,' असे त्याने नमूद केले. मालिकेत आम्ही काही नवीन प्रयोग करणार आहोत. विश्वचषकापूर्वी आम्हाला चार-पाच सामने खेळायला मिळतील. याचा लाभ घेऊ, असेही धोनी
म्हणाला.

बिन्नीचा समावेश शक्य
स्टुअर्ट बिन्नी हा दोन्ही बाजूंना स्विंग करू शकणारा गोलंदाज असून त्याचा उपयोग विश्वचषकातील त्या स्वरूपाच्या खेळपट्ट्यांवर चांगला होऊ शकतो. आक्रमक फलंदाजी करीत असल्याने त्याची संघात निवड करण्यात आली असल्याचे धोनीने नमूद केले.