संघटनांचा वाद; खेळाडूंचा / संघटनांचा वाद; खेळाडूंचा ‘गेम’

कृष्णा तिडके

Aug 08,2011 02:26:15 AM IST

जालना- राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धा आता चांगल्याच वादात सापडलेल्या आहेत. दोन संघटनांच्या मतभेदामुळेच असलेल्या वादामध्येच स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचाच गेम होत आहे. जालना येथे सुरू असलेली राज्यस्तरीय स्पर्धा घेणारी संघटनाच बनावट असल्याचा दावा राज्य थ्रो बॉल संघटनेचे सरचिटणीस फिरोज खान यांनी केला आहे.
ज्यूनिअर थ्रो बॉल स्पर्धेमध्ये मैदानावर किती खेळाडू खेळवावे याबाबतच्या वादाला तोंड फुटले आहे. या स्पर्धेत राज्य संघटनेने नियमानुसार 9 खेळाडू मैदानावर उतरवले आहेत. तर यालाच विरोध सरचिटणीस फिरोज खान यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.
स्पर्धेत केवळ 7 खेळाडूंच खेळवल्या जावे,असा निर्णयच न्यायालयाने दिल्याची स्पष्टोक्ती फिरोज खान यांनी केली आहे. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या स्पर्धेचा खेळाडूं विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा 25 ग्रेस गुणांचा फायदा होणार नसल्याचेही खान यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळेच संघटनेच्या वादामुळ स्पर्धेत खेळणाºया खेळाडूंचा नाहक बळी जात आहे.

खेळाडूंना ग्रेस गुणच नाही
राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना 25 गुणांचा ग्रेस मिळणार नाही .न्यायालयाने याबाबत 9 खेळाडूंना मैदानावर खेळण्याचा प्रकाराला अवैध ठरवले आहे. त्यामुळेच अशाच प्रकारच्या चुकीच्या स्पर्र्धेत खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे.या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा वेळ व पैसा वाया जात आहे. ’’
फिरोज खान, सरचिटणीस,
राज्य थो बॉल संघटना,नागपूर

तर कोर्टाचा निर्णय दाखवा
सेवन ए साईड असल्याचा दावा करणा-यांनी न्यायालयाने दिलेल्या मान्यतेचा निर्णय दाखवावा. हे लोक जाणूनबुजून दिशाभूल करत आहेत. शालेय,राज्यस्तरिय व राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्येही 9 खेळाडूंनाच मान्यता मिळालेली आहे.’’
दिनेश अहिरे, कोषाध्यक्ष, राज्य थो बॉल संघटना

मान्यता आम्हालाच
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने 9 खेळाडुंच्या प्रकारालाच दिलेल्या मान्यतेमुळेच आम्ही स्पर्धा घेत आहोत. प्रत्येक खेळाडूंना ग्रेस गुणचा फायदा मिळणारच आहे.’’
विजय मादाडे, उपाध्यक्ष, राज्य थो बॉल संघटना

X
COMMENT