आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत टायगरची डरकाळी ! , दिल्ली गोल्फ कोर्सवर दाखवली चमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातला नंबर वन गोल्फपटू टायगर वुड्सने मंगळवारी दिल्ली गोल्फ कोर्सवर चमक दाखवली. वुड्सने 18 होलच्या प्रदर्शनीय सामन्यात जबरदस्त खेळाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. हीरो मोटोकॉर्पच्या निमंत्रणावरून वुड्स भारतात आला असून, या दौ-यासाठी त्याला 15 कोटी रुपये मिळाले.
पहिल्या होलवरच वुड्सने दाखवून दिले की, त्याच्या पुढे कोणाचीही चालणार नाही. काही सरावाच्या शॉटनंतर त्याने पाच हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरुवात केली. निळा टी-शर्ट, काळी पँट आणि पांढरी टोपी घालून वुड्सने काही प्रेक्षणीय शॉट मारले. मुंजालसोबत त्याने सुरुवातीला 9 होल खेळले. यात सहा अंडर कार्डचा स्कोअर केला. पुढच्या नऊ होलपैकी 10 आणि 11 व्या होलवर त्याच्यासोबत डीएलएफचा राजीव सिंग आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमजित सेन यांनी खेळाचा आनंद लुटला. भारताची नंबर वन महिला गोल्फपटू शर्मिला निकोलेटने 12 आणि 13 व्या होलवर खेळली. यानंतर प्रणय रॉय अणि अविक सरकार यांनी सुद्धा वुड्ससोबत गोल्फचा आनंद घेतला.
अखेरच्या तीन होलवर रोमांचक सामना : अखेरच्या दोन होलवर दोन संघांत चुरस रंगली. पवन मुंजाल आणि टायगर वुड्स वि. शिव कपूर आणि अनिर्बान लाहिरी यांच्यात सामना रंगला. कपूरने 17 व्या होलवर बर्डी तर मुंजाल आणि वुड्सने 18 व्या होलवर बर्डी लावले. अखेरच्या होलवर दोन्ही संघांनी बर्डी लावले. अठराव्या होलनंतर वुड्सने स्टॅँडजवळ असलेल्या 5 हजार प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. वुड्सने आपल्या दमदार प्रदर्शनाने 10 बर्डी लावल्या.
चॅरिटीत दिले पैसे : सामन्यातून कमवलेल्या काही रकमेचा वाटा वुड्सने चॅरिटी संघटनेला दिला. ‘तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आज खूप मज्जा आली. हे संकरा गोल्फ कोर्स असून, मी नर्व्हस होतो. माझा जवळचा मित्र अर्जुन अटवालने मला भारताबद्दल खूप काही सांगितले होते. येथे येऊन मी खूप आनंदी झालो आहे,’ अशी प्रतिक्रिया वुड्सने व्यक्त केली. वुड्सचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांत क्रिकेटपटू मदनलाल व मुरली कार्तिक उपस्थित होते.
अद्भुत अनुभव : लाहिरी
वुड्ससोबत तीन होल खेळण्याची संधी भारताच्या अनिर्बान लाहिरीला मिळाली. त्याच्यासोबत खेळण्याचा अनुभव अद्भुत होता. अशा महान गोल्फर सोबत खेळणे नेहमी प्रेरक असते. आपण त्यांना महान असल्याचे सांगतो. मात्र, प्रत्यक्षात तेसुद्धा आपल्यासारखेच सामान्य व्यक्ती असतात. त्याच्यासारखेच बनण्याची प्रेरणा मिळते, अशा भावना लाहिरीने व्यक्त केल्या.
15
कोटी रुपयांत वुड्सला बोलावले
18
होलचा प्रदर्शनीय सामना रंगला
5000
प्रेक्षकांनी लुटला आनंद
सचिन आहे कूल : वुड्स
सचिनच्या भेटीनंतर टायगर वुड्ससुद्धा त्याचा चाहता झाला. त्याने हॉटेलात सचिनची भेट घेतली. वुड्सने ट्विट केले. ‘मी आताच महान क्रिकेटपटूची भेट घेतली आहे. त्याच्या कुटुंबीयांनाही भेटलो. सचिन तेंडुलकर खूप कूल व्यक्ती आहे.’